Mother's Day 2022 : बॉलिवूडच्या ‘या’ सुपर मॉम्सला तुम्ही कराल सलाम, एकटीच्या बळावर केला मुलांचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 10:29 AM2022-05-08T10:29:56+5:302022-05-08T13:28:31+5:30

Mother's Day 2022 : एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स ख-या अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात. आज अशाच काही सुपर मॉम्सविषयी माहिती सांगणार आहोत.

एकटीच्या बळावर आई आणि करिअर अशी दुहेरी भूमिका लिलया पार पाडणा-या या बॉलिवूडच्या या सिंगल मदर्स ख-या अर्थात ‘सुपर मॉम्स’ म्हणायला हव्यात. आज अशाच काही सुपर मॉम्सविषयी माहिती सांगणार आहोत.

वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत नीना गुप्ता यांचं अफेअर होतं. याचदरम्यान लग्नापूर्वी नीना प्रेग्नंट राहिल्या. यानंतरही विवियन यांनी नीनांसोबत लग्न केलं नाही. पुढे नीना यांनी एका मुलीला जन्म दिला आणि या मुलीची जबाबदारी स्वत: स्वीकारली. लग्न न करता आई बनलेल्या नीना यांनी मुलगी मसाबाला असं काही घडवले की, ती आज बॉलिवूडची टॉप मोस्ट फॅशन डिझाईनर आहे.

सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिनेही आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे, सारा व इब्राहिमला एकटीने लहानाचं मोठं केलं. सैफपासून विभक्त झाल्यानंतर अमृताने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या दोन मुलांना घेऊन ती दुसºया घरात शिफ्ट झाली आणि एकटीच्या बळावर मुलांचं संगोपन केलं.

करिश्माने बिझनेसमॅन संजय कपूरशी लग्न केलं. पण आपसी मतभेदांमुळे हे लग्न टिकू शकलं नाही. आता करिश्मा कपूर आपल्या दोन मुलांसोबत एकटी राहते. एकटीने दोन मुलांचा सांभाळ करते.

कोंकणा सेन हिनं रणवीर शौरीसोबत लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसानंतरच कोंकणानं तिच्या प्रेग्नंसीची माहिती दिली होती. लग्नाआधीच ती प्रेग्नंट होती. लग्न झालं आणि कोंकणानं मुलाला जन्म दिला. पण काही वर्षानंतर कोंकणा व रणवीर विभक्त झाले. आता कोंकणा एकटीच तिचा मुलगा हरूणचा सांभाळ करतेय.

चाळीशी कधीच ओलांडलेल्या सुश्मिता सेनने अद्यापही लग्न केलेलं नाही. पण ती आई मात्र कधीच झालीय. वयाच्या उण्यापु-या २७ व्या वर्षी सुश्मिताने सिंगल मदर बनण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आणि पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतलं. यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतलं. रेने आणि अलिशा सुश्मिताच्या जीव की प्राण आहेत. ती एकटीच्या बळावर या दोघींचे संगोपन करतेय.

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांनी निर्माता अशोक ठकेरिया यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांना मुलगी पालोमा आणि मुलगा अनमोल अशी दोन मुले झालीत. पण काही वर्षांनंतर पूनम पतीपासून विभक्त झाल्यात आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.