बॉलिवूडमधील या जोड्यांनी दिले आहेत सुपरहिट चित्रपट, बॉलिवूडवर केले आहे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:45 PM2021-03-15T16:45:46+5:302021-03-15T16:59:53+5:30

आमिर खान आणि जुही चावला यांनी कयामत से कयामत तक, हम है राही प्यार के, इश्क यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित ही एकेकाळची हिट जोडी होती. त्यांनी राम लखन, बेटा, तेजाब यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी सुहाग, सिलसिला, मिस्टर नटवरलाल यांसारख्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

कुली नं 1, हिरो नं 1, राजा बाबू यांसारख्या चित्रपटाद्वारे करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

साजन, खलनायक या चित्रपटातील संजय दत्त आणि माधुरी दिक्षित यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

काजोल आणि शाहरुख खानची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, माय नेम इज खान यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.