Sanoj Mishra : "तो अभिनेता नाही..."; 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्या सनोज मिश्रांनी सांगितलं मोनालिसाच्या नवऱ्याचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:22 IST2026-03-22T14:11:14+5:302026-03-22T14:22:11+5:30
Monalisa And Sanoj Mishra : 'द डायरी ऑफ मणिपूर'चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाच्या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे.

प्रयागराज महाकुंभ दरम्यान प्रसिद्ध झालेली 'व्हायरल गर्ल' मोनालिसा भोसले हिच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. केरळमध्ये फरमान खानसोबत लग्न केल्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबीयांनी मुलावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

आता 'द डायरी ऑफ मणिपूर'चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे. सनोज मिश्रा म्हणाले की, "ते नक्कीच केरळ सरकारचे आभार मानतील, कारण केरळने अशा मुलाला तिथे जावई बनवलं आहे."

"आकडेवारी पाहिल्यास लक्षात येतं की, केरळमधून सुमारे दीड हजार मुलींना परदेशात पाठवण्यात आलं आहे, तेही विमानातून नाही तर कंटेनरमध्ये भरून. इतकंच नाही तर दिल्ली आणि मध्य प्रदेशातूनही मुली बेपत्ता होत आहेत."

"जर सरकार आणि तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला, तर त्याचे धागेदोरे केरळशी जोडलेले आढळतील. मुलींच्या बेपत्ता होण्यामागे केरळ सरकारची मोठी भूमिका असू शकते आणि सनातन धर्माला बदनाम करण्यात केरळ सरकार आघाडीवर आहे."

"खरी गोष्ट अशी आहे की, जेव्हा सीएए (CAA) विरोधात निदर्शने सुरू होती, तेव्हा तो (फरमान खान) शाहीन बागमध्ये शरजील इमामसोबत अनेकदा दिसला होता. या प्रकरणांमध्ये 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'चा (PFI) हात असल्याचे स्पष्ट करणाऱ्या अनेक कड्या जुळत आहेत."

सनोज मिश्रा यांनी दावा केला की, फरमान खान अभिनेता नाही, त्याचा कोणताही चित्रपट नाही. चित्रपटाच्या नावावर फक्त पूजा होते आणि एक पोस्टर रिलीज केलं जातं, बस एवढंच.

ही सर्व योजना अशा घटनांना घडवण्यासाठीच आखली गेली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, कारण हा केवळ मोनालिसाचा प्रश्न नसून संपूर्ण देशातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाबाबत दिग्दर्शक म्हणाले, "दोघांचे लग्न म्हणजे 'लव्ह जिहाद' आहे. सर्व गोष्टी स्पष्ट आहेत. तो बागपतचा राहणारा मुस्लिम असून त्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे."

"केरळमध्ये जाऊन लग्न केलं, जे लव्ह जिहादचं मोठं केंद्र बनलं आहे.'द केरळ स्टोरी' सारखे चित्रपट केरळचे सत्य जगासमोर मांडतात" असं देखील सनोज मिश्रा यांनी म्हटलं आहे.

















