कचऱ्यात टाकलेल्या मुलीला जीवनदान दिलं, आज हॉलिवूड गाजवतेय मिथुन चक्रवर्तींची लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:27 IST2025-06-20T15:01:45+5:302025-06-20T15:27:38+5:30
कचऱ्यात टाकलेल्या मुलीला मानलं आपलं, आज गाजवतेय हॉलिवूड, कशी दिसते मिथुन चक्रवर्तींची लेक?

मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडचे स्टार आहेत. त्यांचं सिनेसृष्टीत फार मोठ योगदान आहे. पण, या अभिनेत्याने केवळ अभिनयानेच नाही तर त्याच्या कृतीनेही अनेकदा चाहत्यांची मनं जिंकली.
मिथुन चक्रवर्ती यांचं पहिलं लग्न हेलेना ल्यूक यांच्याशी झालं होतं. मात्र ४ महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मिथुन यांनी योगिता बाली यांच्याशी विवाह केला.
मिथुन चक्रवर्ती आणि योगिता यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मिथुन चक्रवर्ती यांची लेक दिशानीदेखील अभिनयात कार्यरत असून ती हॉलिवूड गाजवत आहे.
दिशानीला मिथुन आणि योगिता यांनी दत्तक घेतलं होतं. जन्म घेताच दिशानीला तिच्या आईवडिलांनी कचराकुंडीत फेकून दिलं होतं.
काही लोकांना दिशानी सापडली आणि त्याची वृत्तपत्रात बातमी आली. ही बातमी वाचताच मिथुन चक्रवर्ती कोलकाताला गेले आणि त्यांनी दिशानीला दत्तक घेतलं.
दिशानीने अमेरिकेतून तिचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे. तर न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून अभिनयाचे धडे तिने गिरवले आहेत.
२०१७ मध्ये तिने दिशानीने गिफ्ट या शॉर्ट फिल्ममधून हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. द गेस्टमध्येही ती दिसली होती.
सध्या दिशानी एका परदेशी मुलाला डेट करत आहे. बॉयफ्रेंडसोबतचे फोटो ती शेअर करताना दिसते.