मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या बोल्ड फोटोशूटला चाहत्यांची मिळतेय दाद, इंस्टाग्रामवर व्हायरल झाले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:07 IST2018-11-13T18:02:52+5:302018-11-13T18:07:25+5:30

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा हॉट व बोल्ड अंदाज इंस्टाग्रामवर होत आहेत व्हायरल
नुकतेच मानुषीने पीकॉक मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी केले फोटोशूट
मानुषी छिल्लर ब्लॅक ड्रेसमध्ये लाइट मेकअपमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
या फोटोशूटमधून मानुषीने नेहमीप्रमाणेच आपल्या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ साली मानुषीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
मानुषी नेहमीच आपल्या सौंदर्याने व फोटोशूटमुळे चाहत्यांच्या लाइमलाइटमध्ये राहते.
मानुषीला अभिनय व मॉडेलिंगसोबतच सिंगिंग व ड्रॉइंगचाही छंद आहे.
मानुषीचे चाहते तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.