Mirzapur 3 : कालीन भैय्याच्या ‘संस्कारी’ सूनेचा कहर, ‘माधुरी भाभी’नं शेअर केले बिकिनी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 04:15 PM2022-06-10T16:15:56+5:302022-06-10T16:22:34+5:30

Mirzapur 3 : या सीरिजमधील कालीन भैय्या, मुन्ना त्रिपाठी या पात्रांनी प्रेक्षकांना जणू वेड लावलं. ‘मिर्झापूर 2’मधील माधुरी यादव या पात्राचीही बरीच चर्चा झाली. सध्याही तिचीच चर्चा आहे.

‘मिर्झापूर’ या वेबसीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता प्रेक्षक या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत.

या सीरिजमधील कालीन भैय्या, मुन्ना त्रिपाठी या पात्रांनी प्रेक्षकांना जणू वेड लावलं. या सीरिजमधील प्रत्येक पात्र गाजलं. ‘मिर्झापूर 2’मधील माधुरी यादव या पात्राचीही बरीच चर्चा झाली. सध्याही तिचीच चर्चा आहे.

होय, माधुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा तलवारचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या त्या बोल्ड लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

सीरिजमध्ये ईशा कालीन भैय्याची संस्कारी सून म्हणून आपल्यासमोर येते. मात्र रिअल लाईफमध्ये ती कमालीची बोल्ड आहे.

सध्या ईशाचा एक बिकिनी लुकमधील बोल्ड फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. यात ती कलरफुल बिकिनीत दिसतेय. नो मेकअप लुकमधील तिच्या या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत.

ईशाने फार कमी वयात अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत पदार्पण केलं होतं. ती एक मॉडेल आहे शिवाय डान्सर अशीही तिची ओळख आहे. आत्तापर्यंत 40 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये तिनं काम केलं आहे.

रॉयल लाईफ जगणारी ईशा 15 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. स्वत:चं अलिशान घर व अनेक लक्झरी गाड्या तिच्याकडे आहेत.

ईशा तलवार एक चित्रपट वा वेबसीरिजसाठी 70 ते 80 लाख मानधन घेते. मॉडेलिंगमधूनही ती तगडी कमाई करते. ट्युबलाईट, कालकांडी, आर्टिकल 15, गिन्नी वेड्स सनी अशा अनेक सिनेमांत ती झळकली आहे.

मिझार्पूर या सीरिजचे आतापर्यत दोन सीझन प्रदर्शित झाले आहे.आता निर्मात्यांनी तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. त्यामध्ये माधुरी यादव एका वेगळ्या लूकमध्ये आणि भूमिकेत दिसणार आहे.

‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये गुड्डू भैय्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. दुसऱ्या भागात कालीन भैय्याच्या भूमिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. आता तिसऱ्या सीझनमध्ये माधुरी भाभी सगळ्यांना सरप्राईज देणार असल्याचं कळतंय.