दीक्षित सिस्टर्स!! माधुरीच्या दोन सख्ख्या बहिणींना कधी पाहिलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:11 IST2022-05-09T13:05:54+5:302022-05-09T13:11:36+5:30
Madhuri dixit:माधुरीच्या दोन्ही बहिणी कथ्थक डान्सर आहेत. मात्र, तरीदेखील त्या कलाविश्वापासून दूर असून त्यांच्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.

आपल्या सौंदर्याच्या आणि नृत्यशैलीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित .
गेल्या कित्येक वर्षांपासून माधुरी तिच्या निखळ हास्यामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच आजही ती धकधक गर्ल या नावानेच ओळखली जाते.
कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली माधुरी कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते.
माधुरी वरचेवर तिच्या कुटुंबीयांसोबतचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यात अनेकदा तिच्या पती वा मुलांसोबतचे असतात.
अनेकदा माधुरी तिच्या आईसोबतचेही फोटो शेअर करत असते. माधुरीची आई तिच्यासोबतच तिच्या घरी राहते.
अलिकडेच माधुरीने मदर्स डे निमित्त एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पहिल्यांदाच तिच्या दोन्ही बहिणी एकत्र दिसून आल्या.
माधुरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई आणि दोन बहिणींसह दिसून येत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
माधुरीला दोन सख्ख्या बहिणी आहेत. यात एकीचं नाव रुपा आहे. तर, दुसरीचं नाव भारती असं आहे. तसंच त्यांना एक भाऊदेखील आहे.
माधुरीच्या दोन्ही बहिणी कथ्थक डान्सर आहेत. मात्र, तरीदेखील त्या कलाविश्वापासून दूर असून त्यांच्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.
"मी जी काही होते, आहे आणि जी काही असेन ते फक्त तुझ्या सावलीमुळेच. हॅप्पी मदर्स डे", असं कॅप्शन देत माधुरीने आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.