Mandira Bedi : इंटरव्ह्यू घेताना क्रिकेटर्स माझ्याकडे...; मंदिरा बेदीचा इतक्या वर्षानंतर मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 12:59 PM2022-03-06T12:59:45+5:302022-03-06T13:20:50+5:30

Mandira Bedi : मंदिरा बेदीला कोण ओळखत नाही. अभिनेत्री, होस्ट अशा वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांनी तिला पाहिलं आहें. क्रिकेट टूर्नामेंटचं अँकरिंग सुरू केलं, तेव्हा अख्ख्या जगात तिची चर्चा होती. पण तो अनुभव कसा होता?

मंदिरा बेदीला कोण ओळखत नाही. अभिनेत्री, होस्ट अशा वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांनी तिला पाहिलं आहें. क्रिकेट टूर्नामेंटचं अँकरिंग सुरू केलं, तेव्हा अख्ख्या जगात तिची चर्चा होती. पण तो अनुभव कसा होता?

क्रिकेट टुर्नामेंटचं अँकरिंग करतानाचा अनुभव कसा होता, क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटर्स तिच्याशी कसं वागायचे, याचा खुलासा इतक्या वर्षानंतर मंदिरा बेदीने केला आहे.

मंदिरा बेदीने 2003 आणि 2007 मध्ये मंदिराने ICC क्रिकेट विश्वचषक, 2004 आणि 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंडियन प्रीमियर लीग सीझन 2 साठी अँकरिंग केलं आहे. एक महिला क्रिकेटचं अँकरिंग करतेय,हे तेव्हा सर्वांनाच नवीन होतं.

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत मंदिरा त्या अनुभवाबद्दल बोलली. शिवाय क्रिकेट होस्ट म्हणून सुरूवातीला आपल्याला कुणीच स्वीकारलं नाही, याची खंतही बोलून दाखवली.

ती म्हणाली, क्रिकेट अँकरिंग करताना मला वेगवेगळं अनुभव आलेत. अनेक लोक जाणीवपूर्वक माझ्या पॅनेलवर चर्चेसाठी आले नाहीत. आज अनेक माजी क्रिकेटपटू माझे मित्र आहेत पण तेव्हा साडी नेसलेली मुलगी क्रिकेटबद्दल बोलते हे त्यांना आवडलं नव्हतं.

अनेक क्रिकेटर्स माझ्याकडे रोखून पाहायचे. अनेकदा मला भीती वाटायची. अर्थात चॅनलने मला खूप पाठींबा दिला. बिनधास्त बोल, बिनधास्त प्रश्न विचार. हे सगळं एन्जॉय कर, म्हणत चॅनल माझ्यापाठीशी ठामपणे उभं राहिलं, असं ती म्हणाली.

त्यावेळी तुझ्या मनात जो प्रश्न येतो तो मोकळेपणाने विचार, मला प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. पण क्रिकेटपटूूंच्या चेहºयावर ही काय विचारतेय, असं का विचारतेय,असे भाव असायचे. त्यांना वाटेल तेच बोलायचे. माझ्या प्रश्नाशी त्याचा काहीच संबंध नसायचा. अनेकदा मला भीती वाटायची, असं मंदिरा म्हणाली.

क्रिकेट अँकरिंगसाठी 150-200 महिलांमधून त्यांनी माझी निवड झाली होती. चॅनलच्या टीमने म्हणूनच मला खूप साथ दिली. आम्ही तुला निवडलं आहे, कारण तुझ्यामध्ये ती गोष्ट आहे की तू टिकू शकते, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे मी कामाचा आनंद घ्यायचं ठरवलं, असंही मंदिरा म्हणाली.

मंदिरा बेदी हिने 1994मध्ये दूरदर्शन शांती कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. मंदिरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. बोल्ड आणि हॉट तितकीच बिनधास्त अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. या मालिकेत मंदिरा बेदीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.