Arbaaz Khan Malaika Arora : बाेल्ड कपड्यांमुळे झाला मलायकाचा घटस्फोट? अखेर अरबाजने सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:53 PM2023-01-12T15:53:35+5:302023-01-12T16:05:43+5:30

Arbaaz Khan Malaika Arora : १९ वर्षे अरबाज व मलायका एकत्र नांदले आणि अखेर एकमेकांपासून वेगळे झालेत. या घटस्फोटाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती, आजही होते....

बॉलिवूड स्टार मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. तिच्या पर्सनल लाईफचीही चर्चा होते.

मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. त्याआधी मलायका अरबाज खानची पत्नी होती. मात्र २०१७ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

सुमारे १९ वर्षे अरबाज व मलायका एकत्र नांदले आणि अखेर एकमेकांपासून वेगळे झालेत. या घटस्फोटाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती, आजही होते.

मला पुढच्या जन्मातही खान कुटुंबाची सून व्हायला आवडेल, असं कधीकाळी मलायका म्हणाली होती. पण याच जन्मात तिचं अरबाजसोबत बिनसलं.

अरबाज व मलायकाचं अचानक काय बिनसलं, दाेघांचा घटस्फोट का झाला, हे कळायला मार्ग नाही. पण बऱ्याचदा मलायकाच्या कपड्यांमुळे हा घटस्फोट झाल्याचंही म्हटलं गेलं.

आता इतक्या वर्षानंतर अरबाजने याबद्दल खुलासा केला आहे. खरंच मलायकाच्या बोल्ड कपड्यांमुळे दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचलं का, यावर तो बोलला.

मलायकाच्या कपड्यांवर तू कधी आक्षेप घेतला होता का? असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत अरबाज खान विचारण्यात आला. यावर त्याने नकारार्थी उत्तर दिलं.

“मी मलायकाला तिच्या कपड्यांबद्दल कधीच बंधनं लादली नाहीत. मी तिच्या कपड्यांचे नेहमीच समर्थन करायचो”, असं तो म्हणाला.

“एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी थांबवलं तर तो तिच गोष्टी जास्त करतो, हे मला माहित आहे. त्यामुळे मलायकाच्या फॅशन स्टाइलबद्दल मी कधीच काही बोललो नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं.

मलायका व अरबाजचा घटस्फोट नेमका कुठल्या कारणाने झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. दोघंही कधीच यावर बोलले नाहीत.

पण दोघांमध्ये मतभिन्नता होती, असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच दोघेही वेगळे झाले. आता दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी आहेत.