PHOTOS : अमृता अरोराच्या घरी रंगली धम्माल पार्टी, मलायका-अर्जुनची चर्चा भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 10:37 AM2021-03-25T10:37:57+5:302021-03-25T10:43:52+5:30

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने या पार्टीत धम्माल केली. त्यांचा रोमॅन्टिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

अमृता अरोराने तिच्या घरी बुधवारी एक छोटीशी पार्टी अरेंज केली आणि काही खास बॉलिवूड सेलिब्रिटी एकदम रंगात आले.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने तर या पार्टीत धम्माल केली. त्यांचा रोमॅन्टिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

याशिवाय करण जोहर, करिश्मा कपूर, संजय कपूर, महीप कपूर, गौरी खान, सीमा खान, मनीष मल्होत्रा व नताशा पूनावाला यांनीही मज्जा केली.

या पार्टीचे फोटो अमृता अरोराने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या पार्टीत मलायका नेहमीप्रमाणे अतिशय ग्लॅमरस अंदाजात पोहोचली होती. शाइनी रेड कलरचा शॉर्ट ड्रेस आणि सोबत मॅचिंग हायहिल्स शिवाय मॅचिंग मास्क तिने घातला होता.

या फोटोत सर्वाधिक लक्षवेधी फोटो ठरला तो मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा. या दोघांचा हा रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

करिश्मा कपूरचा अंदाजही बघण्यासारखा होता.

शाहरूखची पत्नी गौरी खान हिने पार्टीत स्टायलिश एन्ट्री घेतली.

नताशा पूनावाला या पार्टीत अशा झक्कास मल्टीकलर ड्रेसमध्ये दिसली.

मनीष मल्होत्राने संजय कपूरची पत्नी माहिप कपूरसोबत अशी मस्त पोज दिली.