मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात कसा पडला महेश बाबू, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:42 IST2021-08-09T15:33:29+5:302021-08-09T15:42:24+5:30
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार महेश बाबू आज त्याचा 4६ वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 ऑगस्ट 1975 रोजी महेशबाबूचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता.

1999 साली महेशबाबुने अभिनेता म्हणून 'राजा कुमारुदु' या सिनेमातून डेब्यू केला होता.

या सिनेमात त्याची अभिनेत्री प्रिटी झिंटा होती.हा सिनेमा सुपरहिट ठरला.

यानंतर एकसे बढकर एक सिनेमाच्या ऑफर्स महेशबाबूला मिळू लागल्या त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

मराठमोळी नम्रता शिरोडकर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची पत्नी आहे.

2005 साली महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.

दोघांची भेट 2000 साली 'वामसी' सिनेमादरम्यान झाली होती. पाच वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते.

या काळात त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कोणालाच कळू दिलं नव्हतं.

अनेकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगायच्या.मात्र दोघांनीही याकडे फारसे लक्ष न देता मौनच बाळगणे पसंत केले होते.

दोघांच्या आवडी निवडी जुळल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

या कपलला दोन मुलं आहेत.मुलाचे नाव गौतम कृष्णा आणि मुलीचे नाव सितारा आहे.

















