तजेलदार सौंदर्यासाठी माधुरीनं दिल्या खास टिप्स, ५८ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:44 IST2025-12-05T16:31:40+5:302025-12-05T16:44:54+5:30

माधुरी दीक्षितच्या तजेलदार सौंदर्याचं रहस्य काय, दिल्या सोप्या टिप्स!

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित हे बॉलिवूडमधलं एक लोकप्रिय नाव आहे. जेव्हा तिच्या सौंदर्याचा विषय येतो, तेव्हा मात्र सगळेच तिचं कौतुक करतात.

आज ५८ वर्षांची होऊनही माधुरी दीक्षितचं सौंदर्य अबाधित आहे. तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि तिचं ग्रेसफुल व्यक्तिमत्व तितकंच ताजंतरुण दिसतं.

तिची त्वचा इतकी तजेलदार आणि नितळ कशी आहे, हा प्रश्न तिच्या लाखो चाहत्यांना पडतो.

नुकतीच 'मिसेस देशपांडे' या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेल्या माधुरीने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये तिच्या सौंदर्याचं गुपित उघड केलं आहे.

माधुरीनं त्वचेसाठी मॉइश्चरायझर एसपीएफ सनस्क्रीन आणि रेटिनॉइड खूप महत्वाचे असल्याचं सांगितलं. पण, यासोबतचं माधुरीनं हेही सांगितलं की "बाहेरून सुंदर दिसण्यासाठी आतून हेल्दी असणे महत्त्वाचे आहे", असेही तिनं सांगितलं.

माधुरी दीक्षितने सांगितलं की, तुम्ही कितीही स्किन केअर प्रोडक्ट वापरले, तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे सकारात्मकता.

माधुरी म्हणाली, "सौंदर्य हे फक्त स्किन केअर प्रोडक्टमधून मिळत नसतं. आपलं मन देखील तेवढंच सुंदर असलं पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे".

पुढे ती म्हणाली, "कोणाबद्दलही नकारात्मक विचार करू नये. मला लोकांशी बोलायला आवडतं, त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. मी काय आहे, कोण आहे? या गोष्टीचा मला फारसा फरक पडत नाही"

माधुरीने खुलासा केला की ती सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ओंकार आणि गायत्री मंत्राचा जप करते. तसेच नियमितपणे मेडिटेशन करते.

माधुरी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप आठवणीने काढते. यामुळेच तिची त्वचा इतकी स्वच्छ आणि उजळ दिसते.