Madhuri Dixit : पती आणि दोन मुलांसोबत आलिशान घरात राहते धकधक गर्ल माधुरी दीक्षित, जाणून घ्या तिच्या संपत्तीचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:37 IST2023-05-15T13:49:13+5:302023-05-15T14:37:12+5:30

माधुरीची मुंबईत आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे माधुरी दीक्षितने दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावरही माधुरीची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे.फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते.(Photo Instagram)

आज माधुरी दीक्षित आलिशान आयुष्य जीवन जगते आणि यामागे तिची मेहनत स्पष्टपणे दिसून येते.(Photo Instagram)

माधुरी दीक्षितची कमाई चांगली आहे. ती चित्रपट, ब्रँड प्रमोशन, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर कमाई करते. (Photo Instagram)

माधुरी एका सिनेमात काम करण्यासाठी जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचं मानधन घेते. (Photo Instagram)

माधुरीचे मुंबई व अमेरिका या दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टी आहे. तसेच तिच्याकडे रेसिडेन्शिएल अपार्टमेंट व कमर्शिएल प्रॉपर्टी आहे. (Photo Instagram)

माधुरी दीक्षितच्या घराबद्दल बोलायचे झाले तर, ती पती श्रीराम माधव नेने, मुले अरिन आणि रेयान यांच्यासोबत मुंबईतील पलटियाल येथील तिच्या आलिशान बंगल्यात राहते. या बंगल्यात सर्व सुखसोयी आहेत.(Photo Instagram)

इतर सेलिब्रिटींप्रमाणेच माधुरी दीक्षितलाही लक्झरी आणि महागड्या कारची आवड आहे. तिच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे रोल्स रॉयस, ऑडी, स्कोडा रॅपिड आणि इनोव्हा क्रिस्टासारख्या अनेक कार आहेत. (Photo Instagram)

एक रिअलिटी शो जज करण्यासाठी माधुरी 25 कोटी रूपये घेते.याशिवाय एंडोर्समेंटचे वेगळे चार्जेस घेते. चित्रपटांशिवाय जाहिरातीतूनही मानधन मिळते. (Photo Instagram)

माधुरी दीक्षित ही करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरीकडे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. (Photo Instagram)

माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)