घोडेस्वारी करणारी ही छोटी मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री? लेकीच्या करिअरला होता बाबांचा विरोध

By देवेंद्र जाधव | Updated: May 29, 2025 12:31 IST2025-05-29T12:14:51+5:302025-05-29T12:31:16+5:30

घोडेस्वारी करणारी ही क्यूट मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री असून तिने चांगलंच नाव कमावलं आहे. तुम्ही ओळखलं?

फोटोत दिसणारी अन् घोडेस्वारी करणारी ही क्यूट मुलगी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तुम्ही ओळखलं?

या अभिनेत्रीचं नाव आहे ईशा देओल. ईशा देओल सध्या तरी बॉलिवूडमध्ये इतकी सक्रीय नसली तरी तिने एक काळ गाजवला आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक म्हणजे ईशा. अभिनयात करिअर करण्याचं स्वप्न असलेल्या ईशाला वडील धर्मेंद्र यांनी विरोध केला होता.

पारंपरिक पंजाबी कुटुंबाचे धर्मेंद्र यांच्यावर संस्कार असल्याने मुलीने १८ व्या वर्षी लग्न करुन सेटल व्हावं, असं त्यांना वाटत होतं.

परंतु ईशाने धर्मेंद्र यांना समजावलं आणि वेळ मागितला. पुढे ईशाने 'धूम', 'नो एंट्री' आणि 'दस' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमात अभिनय केला

ईशाचं रिअल लाईफमध्ये भरत तख्तानीसोबत लग्न झालं होतं. परंतु २०२४ मध्ये ईशा आणि भरत यांनी घटस्फोट घेतला. ईशा आणि भरत यांना एक मुलगी आहे.

ईशाला धूम सिनेमातून खरी ओळख मिळाली. या सिनेमात जॉन अब्राहमच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत ईशाने बोल्ड आणि ग्लॅमरस अदा दाखवत सर्वांचं लक्ष वेधलं