Kriti Sanon : "मी ढसाढसा रडले, पुन्हा कधीच..", कोरिओग्राफरने ५० लोकांसमोर केला कृती सॅननचा अपमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:12 IST2025-02-18T18:06:55+5:302025-02-18T18:12:54+5:30
Kriti Sanon : कृतीने एका मुलाखतीत जुन्या दिवसांची आठवण सांगितली. तेव्हा तिला आलेला एक वाईट अनुभव सांगितला.

कृती सॅननने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही कृतीला मिळाला आहे.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिमी' चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटातील कृतीच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली.
कृतीने तिच्या एका मुलाखतीत जुन्या दिवसांची आठवण सांगितली. तेव्हा तिला आलेला एक वाईट अनुभव सांगितला. एका कोरिओग्राफरने ५० लोकांसमोर तिचा कसा अपमान केला याबद्दल सांगितलं आहे.
कृती म्हणाली, "हिरोपंती थोडी उशिरा सुरू होणार होती आणि तेलुगू चित्रपटाचं दुसरं शेड्यूल २ महिन्यांनी सुरू होणार होतं. माझ्याकडे मध्ये २ महिने होते, तेव्हा मी GMAT परीक्षा दिली होती."
अभिनेत्री म्हणाली की, ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि फिल्मी बॅकग्राऊंड नसल्यामुळे, तिच्या पालकांना तिच्या करिअरची काळजी करावी लागू नये म्हणून तिने एक प्लॅन बी देखील तयार केला होता.
जीमॅट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही क्रितीला कधीही प्लॅन बी वापरावा लागला नाही. कृतीने सांगितलं की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची.
जेव्हा पहिला रॅम्प शो होता तेव्हा तिच्याकडून थोडी गडबड झाली. खरंतर, तिच्या हिल्स गवतामध्ये अडकल्या होत्या, ज्यामुळे कोरिओग्राफर तिच्यावर रागावला.
अभिनेत्री म्हणाली, “त्या दिवशी त्या कोरिओग्राफरने माझ्याशी असभ्य वर्तन केलं. ५० लोकांसमोर तो माझ्यावर खूप ओरडला. मी ढसाढसा रडले. त्यानंतर मी पुन्हा कधीच त्या कोरिओग्राफरसोबत काम केलं नाही."
२०१४ मध्ये आलेल्या 'हिरोपंती' चित्रपटातून कृतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ती 'दिलवाले', 'लुका छुपी', 'बरेली की बर्फी', 'हाऊसफुल ४' आणि 'भेडिया' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.