रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत क्रिती सनॉनचं Christmas Celebration, फोटो पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:26 IST2024-12-26T10:11:04+5:302024-12-26T10:26:24+5:30

काल 25 डिसेंबरच्या दिवशी जगभरात नाताळ सण साजरा करण्यात आला.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

क्रिती सनॉनने Christmas Celebrationचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

यातील या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये दोन व्यक्तींचे पाय दिसून येत आहेत. हे दोघे क्रिती आणि तिचा बॉयफ्रेंड कबीर असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

अभिनेत्रीनं रुमर्ड बॉयफ्रेंड कबीर बहिया आणि त्याच्या कुटुंबासोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं आहे.

कबीरनेही संपूर्ण कुटुंबाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे हे चित्र अधिक स्पष्ट झाले. या फोटोमध्ये त्याचे आई-वडील, मेव्हणा एमएस धोनी, बहिण साक्षी धोनी, त्याची मुलगी झिवा दिसत आहेत.

या फोटोमध्ये क्रिती कबीरच्या शेजारी बसलेली दिसत आहे. क्रितीने कबीरला तिच्या अगदी जवळ घेतले आहे.

या फोटोत क्रितीसोबत सांताक्लॉजच्या पोशाखात जो व्यक्ती दिसतोय. तो महेंद्र सिंह धोनी आहे. कबीर बहिया हा एम. एस. धोनीची पत्नी साक्षीचा चुलत भाऊ आहे.