कोट्यावधींची मालकीण आहे मिका सिंगची होणारी पत्नी; जाणून घ्या मिका अन् आकांक्षामध्ये कोणाचं Net Worth आहे जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 03:42 PM2022-07-26T15:42:57+5:302022-07-26T15:48:01+5:30

Akanksha puri net worth: आकांक्षा एका चित्रपटासाठी ती २०- ३० लाखांची फी घेत असल्याचं म्हटलं जातं.

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि तितकाच लोकप्रिय गायक मिका सिंहच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत.

'स्वयंवर: मीका दी वोटी' मध्ये मिकाने अभिनेत्री आकांक्षा पुरीची भावी पत्नी म्हणून निवड केली आहे.

मिका आणि आकांक्षा यांची फार जुनी ओळख असून गेल्या १३-१४ वर्षांपासून ते एकमेकांचे मित्र असल्याचं म्हटलं जातं.

मिका आणि आकांक्षा यांची फार जुनी ओळख असून गेल्या १३-१४ वर्षांपासून ते एकमेकांचे मित्र असल्याचं म्हटलं जातं.

प्रथम मैत्री आणि आता लग्न हा प्रवास मिका आणि आकांक्षासाठी खास आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे.

आकांक्षा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

आकांक्षाने हिंदीसह, तामिळ, मल्याळम, कन्नड सिनेइंडस्ट्रीत काम केलं आहे. त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.

आकांक्षाने तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्थान मिळवलं असून तिचं एकूण नेटवर्थ किती आहे ते पाहुयात.

'सेलेबवाला'च्या माहितीनुसार, आकांक्षा एका टीव्ही शो साठी ३५ ते ५० हजार रुपये मानधन घेते. तर म्युझिक व्हिडीओसाठी ती ५ लाख रुपये घेते.

इतकंच नाही तर एका चित्रपटासाठी ती २०- ३० लाखांची फी घेत असल्याचं म्हटलं जातं.

आकांक्षा काही जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमावते. त्यामुळे तिचं एकूण नेटवर्थ ६ ते ८ कोटी रुपये आहे. तसंच तिच्याकडे मर्सिडीज बेंझ ही गाडीदेखील आहे.

मिका सिंगचं नेटवर्थ १५ मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास ६० कोटींच्या आसपास आहे.

मिका महिन्याला ५० लाखांपेक्षा जास्त पैसे कमावतो. त्यानुसार, तो वर्षाकाठी ६ कोटी रुपये कमावतो.

मिकाचा लोखंडवालामध्ये आलिशान बंगला असून त्याच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत.