मुंबईत आलिशान घर अन्... नुकत्याच आई-बाबा झालेल्या सिद्धार्थ आणि कियाराची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:56 IST2025-07-16T09:43:12+5:302025-07-16T09:56:52+5:30

सिद्धार्थ आणि कियाराची संपत्ती पाहून डोळे दिपतील, जाणून घ्या टोटल नेटवर्थ

बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे नुकतेच आई-बाबा (Kiara Advani And Sidharth Malhotra Blessed With Baby Girl) झाले आहेत. लग्नानंतर दोन वर्षांनी या स्टार जोडप्याच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालेलं आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांना मुलगी झाली आहे. कियारा अडवाणीने गिरगाव परिसरातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मंगळवारी १५ जुलै रोजी गोंडस मुलीला जन्म दिलाय. आई आणि बाळ या दोघांची प्रकृती उत्तम आहे. यावर्षीच्या सुरुवातीला कियाराने ती गरोदर असल्याची बातमी दिली होती.

यानंतर आता चाहत्यांमध्ये लोकप्रिय कपलची एकूण नेटवर्थ (Sidharth kiara Net Worth) चर्चेचा विषय ठरतेय. जाणून घेऊया सिद्धार्थ आणि कियाराची संपत्ती नेमकी किती आहे.

इंडस्ट्रीतील यशामुळे कियाराच्या कमाईतही सातत्याने वाढ होत आहे. रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे ४० कोटी (Kiara Advani’s Net Worth 2025) रुपये आहे. प्रत्येक चित्रपटासाठी ती २ते ३ कोटी रुपयांचं मानधन घेते.

त्यामुळे कियारा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याव्यतिरिक्त ब्रँड ॲन्डॉर्समेंटमुळे तिच्या उत्पन्नात वाढ होते. अनेक जाहिरातींमधूनसुद्धा कियारा भरघोस कमाई करते. पण, सिद्धार्थच्या संपत्तीपेक्षा कियाराची कमाई कमीच आहे.

सिद्धार्थची एकूण संपत्ती १०५ कोटी (Sidharth Malhotra’s Net Worth 2025) रुपये आहे. सिद्धार्थ हा प्रत्येक चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी रुपये मानधन घेतो. त्याने 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर 'हँसी तो फँसी', 'एक व्हिलन', 'कपूर अँड सन्स' आणि 'शेरशाह' सारख्या चित्रपटांनी त्याचं स्टारडम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.

कियारा अडवाणी सिद्धार्थ यांची एकूण मालमत्ता सुमारे १४६ कोटी (Sidharth kiara Net Worth 2025) आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर या दोघांची पहिली भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर दोघांनी 'शेरशाह' सिनेमात एकत्र काम केलं. याच चित्रपटाच्या सेटवरच सिद्धार्थ आणि कियारामध्ये प्रेम फुललं.

यानंतर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी या जोडप्याने राजस्थानमधील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं.

या जोडप्याचं मुंबईत एक आलिशान घर आहे, जे स्वतः शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं डिझाइन केलं आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपयांत आहे. याशिवाय या जोडीकडं एक शानदार कलेक्शन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज मेबॅक, हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय बाईक या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सिद्धार्थचा लवकरच 'परम सुंदरी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर जान्हवी कपूर ही 'वॉर २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.