जे बात! सुपरस्टार यश घेऊन येतोय ‘KGF’ पेक्षाही जबरदस्त सिनेमा, बजेट ऐकून थक्क व्हाल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:35 AM2022-09-19T11:35:13+5:302022-09-19T11:42:05+5:30

Kgf Star Yash: होय, यशने एक बिग बजेट सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर यशचा हा सिनेमा ‘केजीएफ’पेक्षाही तुफानी असणार आहे.

‘केजीएफ’ फेम कन्नड सुपरस्टार यश चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. रॉकी भाईच्या केजीएफ 1 व केजीएफ 2 या दोन्ही चित्रपटांनी जगभर धुमाकूळ घातला. अशात तुम्ही रॉकी भाईच्या आगामी सिनेमाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

होय, यशने एक बिग बजेट सिनेमा साईन केल्याची चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर यशचा हा सिनेमा ‘केजीएफ’पेक्षाही तुफानी असणार आहे.

यशचा हा आगामी सिनेमाही हिंदीसह वेगवेगळ्या भाषांत रिलीज होणार आहे. यात एक युद्ध कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, यश लवकरच साऊथ दिग्दर्शक एस. शंकर यांच्यासोबत एका चित्रपटाची घोषणा करू शकतो. सध्या या हिस्टोरिकल ड्रामावर दोघांमध्येही चर्चा सुरू आहे.

हा सिनेमा ‘वेलपेरी’ या तामिळ कादंबरीवर आधारित असल्याचा दावा काही रिपोर्टमध्ये केला जात आहे. या चित्रपटाच्या बजेटबद्दल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

होय, या चित्रपटाची बजेट 1000 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. करण जोहरपासून नेटफ्लिक्ससारखे मोठे बॅनर एकत्र येऊन हा सिनेमा प्रोड्यूस करू शकतात.

अर्थात हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला बरीच मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते. भव्यदिव्य सिनेमा असल्यामुळे हा चित्रपट तयार व्हायला 4 वर्षांचा काळ लागू शकतो. त्यामुळे या चित्रपटासाठी तुम्हाला 2027ची प्रतीक्षा करावी लागू शकते.

अर्थात सध्या अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे खंर काय हे कळायला मार्ग नाही. पण हो, यशचा सिनेमा येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता दुसºया लेव्हलला पोहोचली आहे.

दिग्दर्शक एस. शंकर हे त्यांच्या भव्य दिव्य सिनेमांसाठी ओळखले जातात. 2.0, इंडियन 2 पासून एनथिरनसारख्या सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. आता यशने त्यांचा सिनेमा केलाच तर धमाका होणार हे नक्की मानलं जातंय.