PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:54 PM2022-04-13T12:54:15+5:302022-04-13T13:02:32+5:30

KGF Chapter 2 star Yash : यशने नुकतंच तिरूपती बालाजींचं दर्शन घेत, बालाजींकडे साकडं घातलं. चित्रपटाला यश मिळू देत अशी प्रार्थना त्याने केली.

कन्नड सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा उद्या 14 एप्रिलला चित्रपटगृहांत धडकणार आहे.

‘केजीएफ 2’ रिलीज होणार म्हटल्यावर यशच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी यश बालाजींच्या चरणी नतमस्तक झाला.

यशने नुकतंच तिरूपती बालाजींचं दर्शन घेत, बालाजींकडे साकडं घातलं. चित्रपटाला यश मिळू देत अशी प्रार्थना त्याने केली.

तिरूपती देवस्थानाला भेट देतानाचे यशचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सिम्माचलम या सुप्रसिद्ध मंदिरालासुद्धा भेट दिली आहे. अभिनेत्याचा हा अंदाज चाहत्यांना फारच पसंत पडत आहे. चाहते त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

2018 मध्ये ‘केजीएफ 1’ रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता यश अर्थातच नवीन कुमार गौडाने मुख्य भूमिका साकारली होती.

‘केजीएफ 1’ चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि यश देशभर लोकप्रिय झाला. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला.