थिएटर गाजवलं, आता ओटीटीवर प्रदर्शित होताच घातला 'धमाका', कोणता आहे हा सिनेमा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:50 IST2024-12-30T18:33:54+5:302024-12-30T18:50:03+5:30
थिएटरनंतर आता ओटीटीवर हा सिनेमा धुमाकूळ घालतोय.

Top Trending Film On OTT : एका चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. एक लोकप्रिय अभिनेता आणि तीन सुंदरी असलेल्या या सिनेमाने थिएटर तर गाजवलेच आहे. पण, आता ओटीटीवरही धमाका केलाय.
150 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.
हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे 'भुल भुलैया 3'. आतापर्यंत या सिनेमानं तब्बल 417 कोटी कमावले आहेत.
सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्येही या चित्रपटाने स्थान मिळवले असून या चित्रपटाचा चाहते आनंद घेत आहेत.
हा चित्रपट 1 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यावेळी रुह बाबा सोबत माधुरी दीक्षित आणि विद्या बालन देखील आहेत
माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांचा दमदार अभिनय या सिनेमात पाहायला मिळतोय.
तसेच तृप्ती डिमरी, विजय राय, राजपाल यादव आणि संजय मिश्रा देखील चित्रपटाचा भाग आहेत.
चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत, जी खरोखरच भितीदायक आहेत आणि त्याचवेळी त्यात कॉमेडीचा जबरदस्त टच आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे.
'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.