SEE PICS : बेबोसाठी सैफ बनला फोटोग्राफर, सैफचेच शर्ट घालून करिना कपूरने दिल्या पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 02:51 PM2020-08-13T14:51:21+5:302020-08-13T15:03:56+5:30

दुस-यांदा आई होणार असणा-या करिनाच्या ग्लॅमरस अदा

बेगम करिना कपूर खान दुस-यांदा आई होणार आहे. कालच तिने ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आणि याचदरम्यान तिच्या बोल्ड फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले.

फिल्मफेअर मॅगझिनसाठी बेबोने हे बोल्ड फोटोशूट केले.

कोरोनाच्या भीतीने करिनाच्या अलिशान घरातच हे फोटोशूट केले गेले.

हे फोटोशूट यासाठीही खास आहे कारण, हे सगळे फोटो सैफ अली खानने क्लिक केले आहेत.

इतकेच नाही तर या फोटोशूटसाठी बेगमने सैफचेच शर्ट घातले आहे.

या फोटोशूटमध्ये करिनाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय.

फोटोज शेअर करताना बेबोने सैफवर प्रेमाची बरसात केलीय. आय लव्ह लव्ह लव्ह सैफ ... मला हे शर्ट दिल्याबद्दल आणि हे फोटो काढल्याबद्दल खूप सारे प्रेम, असे तिने लिहिलेय.

फोटोत करिनाच्या अलिशान घराची झलकही पाहायला मिळतेय.

कधी कम्प्युटर टेबलवर तर कधी बुक शेल्फच्या समोर तिने पोज दिल्या आहेत.

करीना लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसणार आहे.

याशिवाय तिने करण जोहरचा मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त'देखील साईन केला आहे. ज्यात तिच्यासोबत अनिल कपूर, विकी कौशल, रणवीर सिंग, आलिया भट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहेत.

Read in English