२००७ पासून तोच आहार घेते करीना, अभिनेत्रीच्या आहारतज्ज्ञांनी संपूर्ण डाएट प्लॅन सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:44 IST2025-07-15T13:08:10+5:302025-07-15T13:44:08+5:30
गेल्या १७ वर्षांत करिनानं तिच्या खाण्याच्या सवयी बदलल्या नाहीत.

कलाकारांच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते. त्यातही अभिनेत्री फिटनेस राखण्यासाठी काय करतात, हा मुद्दा चाहत्यांसाठी उत्सुकतेचा असतो.
बॉलिवूडमधील फिट अँड फाईन दिसणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत करिना कपूर (Kareena Kapoor) घराण्याची लाडकी 'बेबो' देखील आहेच.
करिना कपूरचं नेहमीच कौतुक होतं. दोन मुलांच्या जन्मानंतर तिनं ज्या पद्धतीनं वजन कमी केलं आणि आहारावर नियंत्रण ठेवलं, ते कौतुकास्पद आहे.
करिना कपूर ही प्रचंड फूडी असून वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं तिला आवडतं. तरी ती आपल्या फिटनेसची किती काळजी घेते हे सर्वांना माहित आहे. चाहते तिला तिच्या डाएटसाठी फॉलो करतात.
गेल्या १७ वर्षांत तिनं तिचं आहाराचं (Kareena Kapoor Khan's Diet) वेळापत्रक बदललेलं नाही. आहार आणि योग हे तिच्या फिटनेसचं रहस्य असल्याचं करिनाच्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर ( Rujuta Diwekar on Kareena's Diet) यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वी ऋजुता यांनी 'लल्लनटॉप'च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. करीना नेमकं काय डाएट फॉलो करतेय, याविषयी खुलासा केला.
करीना ही सकाळी सुकामेवा, नाश्त्याला पोहे किंवा पराठा खाते. त्यानंतर ती दुपारच्या जेवणात वरण-भात, संध्याकाळी चिज टोस्ट किंवा मँगो मिल्कशेक घेते.
तर रात्रीच्या जेवणात पुलाव किंवा तूप घालून केलेली खिचडी खाते. आठवड्यातून पाच दिवस ती सहज खिचडी खाते, असं ऋजुता दिवेकरांनी सांगितलं.
करिनानंही एका मुलाखतीमध्ये सकाळी उठल्यावर व्यायाम, संध्याकाळी सहापर्यंत जेवण आणि रात्री साडेनऊ वाजता झोपी जाणं, हे तिचं वेळापत्रक असल्याचं सांगितलं होतं.
नियमितपणे योग करणे हा करीनाचा नियम आहे. आणि योगची सुरुवात ती सूर्यनमस्कार घालून करते. आपल्या फिटनेसमधे सूर्यनमस्काराचं महत्त्व करीनाने अनेक मुलाखतीतून सांगितलेलं आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर करीना कपूर २०२४ मध्ये क्रू व सिंघम अगेन या दोन चित्रपटांत दिसली आहे. दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलेच यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.