Karan Johar : शाहरुख, सलमान सारखा 'स्टारडम' आज कोणाकडेच नाही, करण जोहरची नव्या पिढीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:09 PM2023-01-11T12:09:59+5:302023-01-11T12:16:46+5:30

बॉलिवूड निर्माता करण जोहर गेल्या २५ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे.

बॉलिवूड निर्माता करण जोहर गेल्या २५ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याचे इंडस्ट्रीत मोठे नाव आहे. अनेक कलाकारांचा तो लाडका दिग्दर्शक, मित्र आहे. मात्र करणने एका पॉडकास्टमध्ये थेट बॉलिवूड आणि कलाकारांवरच निशाणा साधला आहे.

करणसाठीही बॉलिवूड म्हणजे एक कुटुंबच आहे. पण असं असतानाही करणलाही बॉलिवूडच्या अनेक गोष्टी खटकतात. मास्टर्स युनियन या पॉडकास्टमध्ये करणने कलाकारांवरच टीका केली आहे. तसंच नव्या पिढीच्या कलाकारांबाबतीतही मोठे विधान केले आहे

५ कोटींच्या सिनेमा ओपनिंगला अभिनेते २० कोटी फीस मागतात. या भ्रमावर कोणतीच व्हॅक्सीन नाही असे वक्तव्य त्याने केले होते. करणने असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले होते.

याशिवाय त्याने व्यावसायिकदृष्ट्या बॉलिवूडपेक्षा तेलगू इंटस्ट्री बरी असेही म्हणले आहे. कोरोनानंतर बॉलिवूडचा अचानक पडता काळ सुरु झाला. अशा परिस्थितीतही कलाकार मानधन वाढवत असल्याचं बघून करण चांगलाच नाराज झाला आहे.

आता करणचे आणखी एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. आजकालच्या पिढीतील अभिनेत्यांमध्ये शाहरुख, सलमान सारखा (Aura)औरा बघायला मिळत नाही असे त्याने म्हणले आहे. म्हणजेच यातून त्याने अनेक नव्या अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.

आजकालच्या कलाकारांवर बोलताना करण म्हणाला,शाहरुख, सलमान आणि आमिर खानने जसे स्टारडम एंजॉय केले तसे आजकालचे अभिनेते एंजॉय करु शकत नाही. शाहरुख, सलमान आणि आमिर हे सुपरस्टार्स आहेत.

प्रसिद्धी आणि सुपरस्टारडम दोन्हींमध्ये फरक आहे. आज कोणीही युट्यूबमधून प्रसिद्धी मिळवत आहे. पण तुम्हाला बघण्यासाठी चाहत्यांची रांग लागणे, लोकांनी उभे राहत तुमची वाट बघणे याला म्हणतात स्टारडम.

आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना लॉंच केलेला सिनेमा स्टुडंट ऑफ द इयर हिट झाला. तरी मला त्यातून नुकसानच झाले होते. असंही तो या पॉडकास्टमध्ये म्हणाला.

करणने बॉलिलूडबाबत केलेले प्रत्येक विधान नक्कीच गंभीर आहे. पैशांसाठी नाही तर चांगला सिनेमा बनावा म्हणून काम करणारे खूप कमी कलाकार राहिले आहेत.