आई-बाबा न होण्याचा निर्णय! लग्नाच्या १३ वर्षानंतर जॉन अब्राहम म्हणाला- "आम्हाला मूल नकोय, कारण..."
By देवेंद्र जाधव | Updated: July 15, 2025 16:02 IST2025-07-15T15:43:28+5:302025-07-15T16:02:35+5:30
जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीने मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्याने यामागे जे कारण सांगितलंय ते महत्वाचं आणि सर्वांना विचार करायला लावणारं आहे

जॉन अब्राहम हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. जॉनला आपण विविध सिनेमामध्ये अभिनय करताना पाहिलंय. जॉनचं रिअल लाईफमध्ये लग्नही झालंय.
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांच्या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली असूनही जॉन आणि प्रियाने आई-बाबा न होण्याचा निर्णय घेतलाय.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका जुन्या मुलाखतीत जॉन म्हणाला होता की, मी सध्या माझ्या कामाला आणि आसपास असलेल्या व्यवस्थेला योग्य करता येईल, याचा विचार करतोय.
एकदा का आसपास असलेली व्यवस्था नीट झाली तरच तुम्ही इतर गोष्टींचा विचार करु शकता, सध्या तरी आम्ही आई-बाबा न होण्याचा निर्णय घेतलाय, असं जॉन म्हणाला.
तुम्ही भविष्याची योजना करु शकत नाही. जेव्हा तुम्ही जबाबदार असाल तेव्हाच तुम्ही आई-बाबा होण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा मुल जन्माला घालण्याचा विचार करु नका, असं जॉन म्हणाला
जर तुम्ही आई-बाबा बनण्याचा आनंद घेऊ शकता याशिवाय मुलांना भरभरुन प्रेम देऊ शकता तरच तुम्ही मुलं जन्माला घालण्याचा विचार करा, असं मत जॉनने व्यक्त केलंय.
जॉन आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांनी २०१३ साली अमेरिकेत कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं. अत्यंत खाजगी पद्धतीने जॉन आणि प्रियाने हा लग्नसोहळा आयोजित केला होता.