पंजाबी सूटमध्ये जान्हवी कुपरचं खुललं सोंदर्य, फोटो पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:45 PM2024-05-26T15:45:43+5:302024-05-26T16:04:54+5:30

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणजे जान्हवी कुपर. जान्हवी तिच्या सुंदर लूकमध्ये सर्वांनाच हैराण करते.

जान्हवी सध्या तिच्या आगामी ''मिस्टर अँड मिसेस माही'' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 31 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सध्या जान्हवी या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकतेच ती सिनेमाच्या प्रमोसनासाठी पंजाबमध्ये पोहचली. यावेळी जान्हवीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमात सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावरच खिळल्या होत्या. जान्हवीचे या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये जान्हवीनं पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे.

जान्हवीने लांबसडक वेणी कानात झुमके असा लूक तिनं केला.

सोशल मीडियावर जान्हवीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांना तिचे फोटो पसंत पडत आहेत.

हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये रोमान्सही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे.

हे फोटो पाहता जान्हवीवरुन नजरच हटत नाही आहे. सर्व जण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.

या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे.