प्रायव्हेट आयलंडसोबत जॅकलिन फर्नांडिसकडे आहेत 'या' लक्झरी गोष्टी, प्रॉपर्टीचा आकडा पाहताच जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 05:29 PM2021-12-07T17:29:06+5:302021-12-07T17:40:00+5:30

मनी लॉन्ड्रिंग केसमुळे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या चर्चेत आहे. जॅकलिनला 8 डिसेंबरला ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे.ईडीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात 200 कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी लुक आऊट सर्क्युलर जारी केले आहे.(Photo Instagram)

मनी लाँड्रिंग प्रकरणातील (Money Laundering Case) आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar)च्या जॅकलिन जवळची व्यक्ती आहे. (Photo Instagram)

सुकेशनं जॅकलिनवर लाखो रूपयांची उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. होय, सुकेशने जॅकलिनला खूश करण्यासाठी तिला कोट्यवधी रूपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. (Photo Instagram)

सुकेशने जॅकलिनला खूश करण्यासाठी तिला कोट्यवधी रूपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, सुकेश हा जॅकलिनला चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता.(Photo Instagram)

सुकेशने जॅकलिनला भेट म्हणून 52 लाखांचा घोडा आणि 9 लाख रुपयांचं पर्शियन मांजर भेट दिल्याचं समोर आलं आहे. याचबरोबर त्याने अनेकदा जॅकलिनला महागडे दागिने भेट दिल्याचंही कळतंय.जॅकलिनच्या नावावर हिट सिनेमे नसले तरी तिच्याकडे करोडोंची प्रॉपर्टी आहे. (Photo Instagram)

जॅकलिन 12 वर्षे सिनेमांमध्ये काम करते आहे. मीडिया रिपोर्टनुसार जॅककडे जवळपास 10 मिलियन डॉलर म्हणजे 74 कोटी रुपायांची संपत्ती आहे. एका सिनेमात काम करण्याचे जॅकलिन 3 ते 4 कोटी रुपये घेते. (Photo Instagram)

याचवर्षी जानेवारीमध्ये जॅकलिनने मुंबईत आपले नवं घर खरेदी केले होते. ज्याची किंमत करोडोमध्ये आहे. जॅकलिन आधी प्रियंकाच्या घरात भाड्याने राहायची. जॅककडे अनेक लग्झरी कारचे कलेक्शन आहे. (Photo Instagram)

जॅकलीनचे मूळची श्रीलंकेची आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनार्‍याजवळ तिचं एक बेट देखील आहे. जॅकलिनचा स्वतःचा रेस्टॉरंटचा व्यवसायही आहे. जॅकलिनचे श्रीलंकेतील कोलंबो येथे रेस्टॉरंट आहे.(Photo Instagram)

जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिग्दर्शक निर्माता साजिद खानसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत आली. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.(Photo Instagram)