PHOTOS : सोशल मीडियावर जावेद जाफरीच्या लेकीची चर्चा, सुंदर इतकी की जान्हवी-साराला विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:45 PM2021-04-23T17:45:06+5:302021-04-23T17:59:06+5:30

अलविया जाफरीचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

अ‍ॅक्टर, डान्सर, कॉमेडियन, रिअ‍ॅलिटी शोचा जज जावेद जाफरी (Jaaved Jaaferi ) यांना कोण ओळखत नाही? पण जावेदच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. जावेदची मुलगी अलविया जाफरी सध्या सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे.

अलविया जाफरीचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

जावेद जाफरीची लेक अलविया जाफरी 24 वर्षांची आहे. अभिनेता मिजान जाफरीची ती बहीण. याशिवाय तिला आणखी एक लहान भाऊ आहे़ त्याचे नाव अब्बास आहे.

अलवियाने धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. सध्या ती न्यूयॉर्कच्या पारसंस स्कूल आॅफ डिझाइनमधून फॅशन व डिझाइनचा अभ्यासक्रम करतेय.

जावेद जाफरीची मुलगी अलविया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ग्लॅमरस फोटोंनी तिचे इन्स्टा अकाऊंट भरलेले आहे.

अलवियाचे फोटो अनेक सारा, जान्हवी या सगळ्यांना मात देणारे आहेत.

अलवियाचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे. तिच्या फोटोंवर फॉलोअर्स फिदा आहेत.

बॉलिवूडमध्ये अलविया फार अ‍ॅक्टिव्ह नाही़ बॉलिवूडच्या इव्हेंटला ती फार क्वचित दिसते.

मात्र जान्हवी कपूर,नव्या नंदा, सारा तेंडुलकर या सेलिब्रिटी स्टार किड्स अलवियाच्या मैत्रिणी आहेत.

जावेद जाफरी ख-या आयुष्यात अतिशय शिस्तप्रिय आहे. बाबाच्या या शिस्तप्रिय स्वभावाचा घरात चांगलाच दरारा आहे.

आम्ही सगळे पापाला घाबरतो. मी, माझे दोन्ही भाऊ पापाला घाबरतात, असे अलवियाने एका मुलाखतीत सांगितले होते ते म्हणूनच.

अभिनय क्षेत्रात येण्याचा अलवियाचा कुठलाही इरादा नाही. तिच्या भावाने म्हणजेच मिलानने कधीच बॉलिवूड डेब्यू केला आहे. पण अलवियाने अद्याप तरी तसा विचार केलेला नाही.