भावाच्या लग्नात इशा अंबानीची चर्चा; हेवी डिझायनर ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 09:05 IST2024-03-04T08:54:20+5:302024-03-04T09:05:02+5:30

Isha ambani look: ३ मार्च रोजी अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनचा शेवटचा दिवस होता. यावेळी इशा अंबानीचा लूक सर्वाधिक चर्चेत राहिला.

सध्या सगळीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनची चर्चा रंगली आहे.

या प्री वेडिंग फंक्शनला देशविदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली असून प्रत्येक जण त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये अंबानींची लाडकी लेक इशा हिची चर्चा रंगली आहे.

३ मार्च रोजी अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनचा शेवटचा दिवस होता. यावेळी इशा अंबानीचा लूक सर्वाधिक चर्चेत राहिला.

या प्री वेडिंग फंक्शनसाठी इशाने शिमरी रेड कलरचा फिशकट असलेला लेहंगा परिधान केला होता. हा ड्रेस खास मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता.

या रेड कलरच्या लेहंग्यावर तिने ग्रीन कलरची डायमंड ज्युलरी परिधान केली होती.

इशा या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इशाने हा लूक आणखी खुलून दिसावा यासाठी फर असलेला एक श्रग सुद्धा कॅरी केला आहे.

इशाने या लूकसोबत केसांची यूनिक पोनी हेअरस्टाइल केली आहे.