Indian Web Series: टॉप १० लिस्ट, अव्वल स्थानावर आहे हंसल मेहताची स्कॅम १९९२, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 17:18 IST2020-12-10T17:18:23+5:302020-12-10T17:18:23+5:30

हंसल मेहताची स्कॅम १९९२ः द हर्षद मेहता स्टोरी आईएमडीबीवर २०२०च्या टॉप दहाच्या भारतीय वेबसीरिजच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.
स्कॅम १९९२मध्ये हर्षद मेहताने शेअर बाजारात केलेला घोटाळा उत्तमरित्या वेबसीरिजमध्ये रेखाटला आहे. आईएमडीबीच्या रेटिंगमध्ये टॉप १०मध्ये चित्रपट किंवा मालिकेला रेटिंग युजर देतात.
सोनीलिव्हच्या स्कॅम १९९२ला १० पैकी ९.५ रेटिंग मिळाली आहे आणि आईएमडीबीच्या २५० सीरिजमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या पंचायत सीरिज दुसऱ्या स्थानावर आहे तर हॉटस्टारची स्पेशल ऑप्स तिसऱ्या स्थानावर आहे.
यादीत बंदिश बँडिट्स चौथ्या क्रमांकावर आणि मिर्झापूरचा दुसरा सीझन पाचव्या क्रमांकावर आहे.
आईएमडीबीचे संस्थापक आणि सीईओ कोल नीधमने सांगितले की, भारतीय सीरिजमध्ये जगभरात जास्त इंटरेस्ट पहायला मिळाला.
नीधम यांनी म्हटले की, या वर्षी अव्वल स्थानावर असलेल्या स्कॅम १९९२ ही वेबसीरिज लोकप्रिय झाली आहे.
वूट सिलेक्टवर असूर सहाव्या स्थानावर, पाताल लोक सातव्या स्थानावर, अभय नवव्या स्थानावर आणि आर्या दहाव्या स्थानावर आहे.