कान्स रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्रींना भावली 'साडी'; दिसल्या 'जगात भारी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:43 IST2025-05-21T15:38:17+5:302025-05-21T15:43:51+5:30

एकीने नेसली ७० वर्ष जुनी साडी, तर दुसरीला तिच्या बॉयफ्रेंडच्या आईने दिली गिफ्ट

७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटींचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा बघायला मिळाला. दरम्यान काही भारतीय नारी इतरांवर भारी पडल्या. साडी नेसून त्यांनी रेड कार्पेटवर जलवा दाखवला

शर्मिला टागोर यांनी यंदा कान्सला गेल्या होत्या. सुंदर बनारसी साडी नेसून त्या रेड कार्पेटवर आल्या. हिरवी साडी, गोल्डन काठ असलेली हिरवी साडी त्यांनी परिधान केली होती. यात त्या खरोखर एव्हरग्रीन दिसत होत्या.

देवांगी निसार पारेखने तिच्या साडी लूकमध्ये ट्विस्ट आणला होता. Rimzim dadu यांनी स्टाईल केलेल्या हँडक्राफ्टेड ब्लू साडी गाऊनमध्ये ती सुंदर दिसत होती. याचं ऑफ शोल्डर डिझाईन, हाय-स्लीट कट आणि वेवी पदर फारच युनिक दिसत होता. यावर तिने डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.

अभिनेत्री पारुल गुलाटीने बनारसी टिशू साडीला पसंती दिली. डिझायनर रिद्धी बन्सलने ही साडी डिझाईन केली होती. याचं कापड रेजिनमध्ये बुडवून तयार केलं होतं आणि पारुलच्या बॉडीकर्व्हजनुसार ते मोल्ड करण्यात आलं. याचा मिरर वर्क असलेला पदर होता. यासोबत तिने नथ घातली होती.

साक्षी सिंधवानीनेही आपल्या स्टाईलने कान्समध्ये जलवा दाखवला. मोनिका आणि करिश्मा यांचा लेबल Jade ची कस्टम साडी तिने परिधान केली होती. याचा हॉल्टर नेक ब्लाऊजही लक्ष वेधून घेत आहे. तसंच ब्रालेट एरियाच्या वर फ्लोरल नेट आहे जे आकर्षक दिसत आहे.

अभिनेत्री सारा सरोशनेही कान्ससाठी साडीलाच पसंती दिली. तिचे तिनही लूक साडीतील होते. कल्कि फॅशन फ्रेंच ब्लू चिकनकारी साडी तिने नेसली होती. तर दुसऱ्या दिवशी ती व्हाईट फ्लोरल टिश्यू सिल्क साडीत सुंदर दिसली. मात्र तिने नेसलेली असमिया पाट सिल्क पिवळी साडी सर्वात चर्चेत होती. ही साडी तिला तिच्या बॉयफ्रेंडच्या आईने दिली होती.

दिशा मदाननेही कान्स रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. तिने कांजीवरम साडी नेसली होती जी ७० वर्ष जुनी आहे. ही साडी हाताने विणलेली असून याला ४०० तास लागले आहेत. याचा कॉर्सेट ब्लाऊज चार कारागिरांनी विणला ज्याला २५० तासांचा वेळ लागला.