पनवेलची मुलगी जागतिक स्तरावर चमकली! डॉक्टरी सोडून बनली मॉडेल, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना लग्न केलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:37 IST2026-03-05T13:22:44+5:302026-03-05T13:37:18+5:30

भारताची पहिली मिसेस वर्ल्ड! सौंदर्य स्पर्धेतून येऊन बॉलिवूडमध्येही कमावलं नाव, ४९ व्या वर्षीही दिसते तितकीच सुंदर

सौंदर्य स्पर्धांतून हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन स्थिरावणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री आहेत. मात्र, कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय इंडस्ट्रीत ज्यांनी आपलं स्थान पक्कं केलं त्यापैकी एक नायिका म्हणजे आदिती गोवित्रीकर.

मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळणाऱ्या आदिती यांनी ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकली होती.२१ मे १९७६ रोजी पनवेल येथे आदितीचा जन्म झाला.

मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळणाऱ्या आदिती यांनी ९० च्या दशकात आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकली होती.२१ मे १९७६ रोजी पनवेल येथे आदितीचा जन्म झाला.

२००१ साली 'सोच' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अदितीने 'पहेली', 'दे दना दन' अशा चित्रपटांत काम केलं आहे. तसंच बिग बॉस ३ आणि खतरों के खिलाडीसारख्या रिअॅलिटी शोजमध्येही ती झळकली होती.

फॅशन, मॉडलिंग तसेच अभिनयक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री आदिती गोवित्रीकरच्या मोहक सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आदिती तितकीच फिट आणि सुंदर दिसते.

साल २००० मध्ये मिसेस वर्ल्ड आणि त्यानंतर लागोपाठ २००१ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला.अदिती गोवित्रीकर एक अभिनेत्री, सुपर मॉडेल व सायकॉलॉजिस्ट आहे. ती मानसिक समस्यांविषयी समाजात जागरूकता करत असते.

आदितीची ड्रेसिंग स्टाइल, तिचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज देखील लावता येत नाही. फॅशन विश्वात या मराठमोळ्या अभिनेत्रीचे भरपूर कौतुक झाले.आदिती आपल्या फिटनेसच्या बाबतीत एकमद चोख आहे. ती मार्शल आर्ट देखील शिकली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने आईवडिलांच्या विरोधात जाऊन मुफझल लकडावाला यांच्याशी लग्न केलं होतं. कॉलेजमध्ये असताना दोघांची भेट झाली होती. ७ वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकले. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या काही वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला. आदितीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.