१८ वर्षांपूर्वी शाहिद आणि करीना कपूरचं का झालं होत ब्रेकअप? कुणी दिला होता 'गुलिगत धोका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:34 IST2025-03-09T15:23:31+5:302025-03-09T15:34:59+5:30
बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेम प्रकरणांपैकी एक म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूरचं (Kareena Kapoor) अफेअर.

IIFA २०२५ या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण सर्वात जास्त व्हायरल होणारा व्हिडिओ म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांची भेट. १७ वर्षांच्या ब्रेकअपनंतर दोघेही एकमेकांना अत्यंत आनंदाने भेटताना पाहायला मिळाले. ज्याचा Video सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
एकवेळी होती जेव्हा शाहिद आणि करीना एकमेंकाच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करीनाने सैफ अली खानशी लग्न केलं.
पण अनेकदा दोघांपैकी ( Shahid Kareena Kapoor Breakup Story) नेमका कुणी कुणाला धोका दिला, याबद्दल चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसून येते.
२००७ मध्ये वेगळे होण्यापूर्वी शाहिद कपूर आणि करीना कपूर अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनीही फिदा, चुप चुप के आणि जब वी मेटसारख्या हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. करीना आणि शाहिद यांनी २००४ ते २००७ पर्यंत एकमेकांना डेट केले होतं. दोघेही त्यांच्या नात्याबाबत अत्यंत सीरियस होते.
करीना शाहिदच्या प्रेमात वेडी होती. त्याच्यासाठी ती शाकाहारी बनली होती. 'जब वी मेट' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच दोघांचे ब्रेकअप झालं. शाहिद आणि करीनाने त्यांच्या ब्रेकअपबद्दल कधीही उघडपणे भाष्य केलेलं नाही.
शाहिद आणि करीनाच्या ब्रेकअपबद्दल अनेक कारण सांगितली जातात. शाहिदच्या एका मित्राने माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की करीनाने शाहिदला धोका दिला होता. अशीही चर्चा रंगते की ब्रेकअपचं कारण कधी शाहिद आणि अमृता रावची जवळीक ठरली होती.
नेहा धुपियाच्या एका चॅट शोमध्ये शाहिद कपूरला विचारण्यात आलं होतं की, प्रेमात त्याला कोणी फसवले आहे का? यावर, अभिनेत्याने म्हटलं, "मी एकीने दिल्याचं सांगू शकतो. पण, दुसरीबद्दल मला थोडी शंका आहे". यावेळी शाहिदने कुणाचेही नाव घेतलं नाही.
करीना आणि शाहीद हे दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. असं असलं तरी सध्या व्हायरल होणाऱ्या त्यांच्या व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
'जब वी मेट'मधील गीत आणि आदित्य या हिट जोडीला एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. आता इतक्यावर्षानंतर पुन्हा दोघांना एकत्र हसताना पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे.
मीरा कपूरशी लग्न केल्यानंतर शाहिद कपूर सुखाचा संसार करतोय. त्याला एक मुलगी मीशा आणि एक मुलगा जैन आहे. तर बेबेलाही तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत.