Hrithik Roshan : हृतिकच्या 8 pack abs वर बॉलिवुडही फिदा; 'फायटर' साठी करतोय जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 15:39 IST2023-01-02T15:29:52+5:302023-01-02T15:39:19+5:30

बॉलिवुडमधल्या फिट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे 'हृतिक रोशन' (Hritik Roshan). हृतिकचा 'फायटर' हा आगामी सिनेमा लवकरच येणार आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेताना दिसतोय. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो बघून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. तरुण अभिनेत्यांनाही लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे.

हिंदी सिनेमाचा सर्वात फिट अभिनेता हृतिक रोशन. त्याच्याकडे बघून त्याच्या वयाचा अंदाजही येणार नाही. अख्खी बॉलिवुड इंडस्ट्री सुद्धा हृतिकची चाहती आहे. टायगर श्रॉफ तर स्वत:ला हृतिकचा सर्वात मोठा चाहता म्हणतो.

तर हृतिक आगामी फायटर सिनेमात दिसणार आहे. सिनेमा रीलीज व्हायला अजून वेळ आहे. २०२४ मध्ये सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. फायटर मधून पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिकाची जोडी एकत्र येत आहे.

फायटरसाठी हृतिक प्रचंड मेहनत घेताना दिसतोय. दिवसरात्र जिममध्ये घाम गाळतोय. हतिकने मध्यंतरी पुन्हा शेप मध्ये येणं किती अवघड गेलं याचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला होता.

आता हृतिकने पोस्ट केलेले हे फोटो बघून सगळेच अवाक झालेत. ४९ व्या वर्षीही हृतिक त्याने चक्क ८ पॅक अॅब्स बनवले आहेत. हे फोटो पाहून त्याच्या फिटनेसचा अंदाजा येऊ शकतो.

हृतिकच्या या फोटोंवर वरुण धवन, अनिल कपूर यांनीही कमेंट केले आहेत. अनेक अभिनेते हृतिककडून प्रेरणा घेताना दिसतात.

हृतिकचा फिटनेस बघून चाहते सुद्धा प्रेरित होत आहेत. कहो ना प्यार है या त्याच्या पहिल्या चित्रपटापासून त्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्याच्या फिटनेसवर चाहते फिदा आहेत.

हृतिक बद्दल बोलायचं म्हणलं की त्याचा डान्स हा आलाच. बॉलिवुडमधला आजवरचा बेस्ट डान्सर म्हणून हृतिकला ओळखले जाते. हृतिकच्या डान्स स्टेप्स कित्येक लोक आजही कॉपी करताना दिसतात.

फिटनेस आणि बेस्ट डान्सर सोबतच हृतिक तेवढाच हॅंडसमही आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका एजन्सीने 'मोस्ट हॅंडसम मेन'च्या यादीत हृतिकचे नाव सामील केले होते. या यादीत त्याने रॉबर्ट पॅटिन्सन, क्रिस इव्हान्स यांनाही मागे टाकले.