हृतिक रोशन दररोज काय खातो? मराठी फिटनेस ट्रेनरचा खुलासा, म्हणाला- "ज्वारीची भाकरी, भेंडी, अन्.."

By देवेंद्र जाधव | Updated: August 20, 2025 16:12 IST2025-08-20T15:49:29+5:302025-08-20T16:12:54+5:30

Hrithik Roshan Fitness Diet Secret: हृतिक रोशन ५१ व्या वर्षी तरुणाईला लाजवेल असा फिटनेस सिनेमांमध्ये दाखवतो. काय आहे हृतिकच्या फिटनेसचं रहस्य. जाणून घ्या

हृतिक रोशनचा 'वॉर २' सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमासाठी हृतिकने स्वतःच्या शरीरयष्टीवर घेतलेली जबरदस्त मेहनत सर्वांना थक्क करुन सोडत आहे.

'वॉर २' साठी हृतिकने खास डाएट आणि योग्य व्यायाम करुन तरुणांना लाजवेल अशी बॉडी कमावली आहे. हृतिकचा मराठमोळा फिटनेस ट्रेलर स्वप्नील हजारेने याचा खुलासा केलाय

हृतिक दिवसभरात दर अडीच-तीन तासांनी काहीतरी खायचा. रात्री जास्तीत जास्त ९ वाजेपर्यंत तो दिवस संपवायचा. त्यानंतर सकाळपर्यंत तो काहीच खायचा नाही.

अंडी, चिकन, दही, ओट्स अशा गोष्टींचा हृतिकच्या डाएटमध्ये समावेश असायचा. यामुळे हृतिकला दिवसभर ताकद मिळायची.

याशिवाय मूगाची डाळ, भेंडीची भाजी, ज्वारीची भाकरी, एक वाटी दही असं साधं खाणंही हृतिक तितक्याच आवडीने खायचा. त्यामुळे हृतिकच्या पोटालाही आराम मिळायचा.

या संपूर्ण काळात गोड पदार्थ आणि डेझर्ट अजिबात समाविष्ट नव्हते. हृतिकनेही सर्व नियमांचं व्यवस्थित पालन करुन स्वतःच्या शरीरावर काम केलं

कधीकधी कंटाळा आलाच तर हृतिक BBQ चिकन, पिझ्झा खाऊन स्वतःचं मन आनंदी करायचा. याशिवाय साखर, मशरुम, तेल, मैदा हे पदार्थ हृतिकने खाणं टाळलं.