एका जाहिरातीने कशी जुळवली अनुष्का-विराटची प्रेमगाठ?, वाचा त्यांची ही क्युट लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:07 IST2025-12-11T12:59:40+5:302025-12-11T13:07:08+5:30

Anushka Sharma-Virat Kohli : बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये एक कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. साधेपणा, मजबूत बॉन्ड आणि सुंदर केमिस्ट्रीमुळे प्रसिद्ध असलेले हे स्टार कपल आज त्यांची ८वी वेडिंग ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोडप्यांमध्ये एक कपल म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. साधेपणा, मजबूत बॉन्ड आणि सुंदर केमिस्ट्रीमुळे प्रसिद्ध असलेले हे स्टार कपल आज त्यांची ८वी वेडिंग ॲनिव्हर्सरी साजरी करत आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने 'विरुष्का'च्या प्रेमाची सुरुवात कशी झाली, यावर एक नजर टाकूया.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची पहिली भेट २०१३ साली एका जाहिरातीच्या सेटवर झाली, जी खूपच मनोरंजक ठरली.

सूत्रांनुसार, त्या वेळी विराट अभिनयाबद्दल अनभिज्ञ असल्याने खूप नर्व्हस होता.

या ॲड शूटनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांना अनेकदा एकत्र पाहिले जाऊ लागले.

या जोडप्याकडे चाहत्यांचे लक्ष अधिक वेधले गेले ते जानेवारी २०१४ मध्ये. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मुंबई विमानतळावर पोहोचली असताना:

विराट कोहली बाकीच्या टीमसोबत हॉटेलमध्ये न जाता थेट अनुष्काच्या अपार्टमेंटमध्ये गेला, ज्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली.

या घटनेनंतर, विराटने मेलबर्नमध्ये शतक झळकावले, तेव्हा अनुष्का तेथे उपस्थित होती. विराटने शतक पूर्ण झाल्यावर अनुष्काला फ्लाइंग किस दिला. या कृतीमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक जोर मिळाला आणि डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या.

काही वर्षे डेटिंग केल्यानंतर, अनुष्का आणि विराटने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये मोठ्या थाटात लग्न केले.

आज हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत. २०२१ मध्ये त्यांनी मुलगी वामिका हिचे तर २०२४ मध्ये मुलगा अकायचे स्वागत केले.