एक कोटीचं घड्याळ अन् महिन्याला ४२ कोटींची कमाई; Honey Singh चं नेटवर्थ पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:00 PM2023-03-15T12:00:49+5:302023-03-15T12:06:47+5:30

Honey singh: हनी सिंहचं नोएडामध्ये घर आहे. तसंच पंजाबमध्येही त्याने ३ कोटींचं घर घेतलं आहे. विशेष म्हणजे गुडगांव, दिल्ली आणि मुंबई येथेही त्याची आलिशान घरं आहेत.

आपल्या हटके स्टाइल आणि रॅपसाठी ओळखला जाणारा प्रसिद्ध गायक म्हणजे हनी सिंग.

हनी सिंगच्या गाण्यांची जितकी चाहत्यांमध्ये चर्चा होत असते, त्याच्यापेक्षा कैकपटीने त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा रंगताना पाहायला मिळते.

हनी सिंग समावेश आज श्रीमंत गायकांच्या यादीत केला जातो. विशेष म्हणजे तो प्रचंड लक्झरी लाइफ जगतो. त्यामुळेच त्याचं नेटवर्थ किती आहे ते पाहुयात.

हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह असं असून कलाविश्वात येण्यापूर्वी त्याने त्याचं नाव बदललं.

सुरुवातीच्या काळात यूट्यूब व्हिडीओपासून करिअरची सुरुवात करणारा हनी सिंह आज कोट्यावधींचा मालक आहे.

हनी सिंगला महागड्या वस्तू वापरण्याची आवड असून तो चक्क १ कोटी रुपयांचं घड्याळ वापरतो.

हनी सिंहला गाड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये ऑडी क्यू 7, ऑडी आर8, जेगुआर,रोल्स, बीएमडब्ल्यू यांचा समावेश आहे.

हनी सिंहचं नोएडामध्ये घर आहे. तसंच पंजाबमध्येही त्याने ३ कोटींचं घर घेतलं आहे. विशेष म्हणजे गुडगांव, दिल्ली आणि मुंबई येथेही त्याची आलिशान घरं आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, रॅपर हनी सिंह दरवर्षी साधारण ४२ कोटी रूपयांच्या आसपास कमाई करतो.

हनी सिंग एका गाण्यासाठी १५ लाख रुपये मानधन घेतो. त्यामुळे देशात सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

हनी सिंहकडे २५ मिलियन यूएस डॉलरची संपत्ती असून भारतीय चलनानुसार ही रक्कम १७३ कोटी रूपयांच्या आसपास होते.