आला होळीचा सण… राशा थडानीचं खास फोटोशूट, दिसतेय लयचं भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:02 IST2025-03-05T18:45:12+5:302025-03-05T19:02:14+5:30

Holi 2025: रंगोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. होळीच्या विविध रंगात सर्वच जण नाहून निघतात.

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने सोशल मीडियावर काही फोटो (Rasha Thadani's Colorful Photoshoot) पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये राशा ही होळीच्या रंगात रंगलेली दिसून येत आहे.

गुलाबी शर्ट, त्यावर निळ्या रंगाची जिन्स आणि हवेत उडालेला सुका रंग असं देखणं फोटोशूट तिने केलं आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अलिकडेच राशा हिने 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

विशेषत: राशाचे 'उई अम्मा' हे गाणे रिलीज होताच व्हायरल झालं होतं.