तो आला, त्याने गायलं अन् सोनूचं मन जिंकलं; व्हायरल युवकांचं नशिबच पालटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:08 PM2023-03-01T15:08:07+5:302023-03-01T15:35:19+5:30

मागील काही दिवसांपासून बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात राहणारा गायक अमरजीत जयकर सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या अमरजीतला गायनाची आवड असून, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.

मागील काही दिवसांपासून बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात राहणारा गायक अमरजीत जयकर सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या अमरजीतला गायनाची आवड असून, त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.

व्हिडिओ पाहून नेटकरी त्याच्या गाण्याचे तोंडभरुन कौतुकही करत आहेत. अमरजीतने त्याच्या यशाचे श्रेय गर्लफ्रेंडला दिले आहे. त्याच्या गर्लफ्रेंडने भेट म्हणून दिलेल्या गिटारमुळे त्याने गाण्याचा सराव सुरू केला आणि तो व्हायरल झाला.

बीए प्रथम वर्षात शिकत असलेला अमरजीत स्टेज शो करतो. तसेच, त्याला भविष्यात गायक बनायचे आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने त्याच्या गाण्याचे कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे, सोनूने अमरजीतला त्याच्या आगामी 'फतेह' या चित्रपटात गाण्याची ऑफरही दिली आहे. त्यासाठी, अमरजीत आता 27 फेब्रुवारी रोजी मुंबईत आला होता. त्याने सोनू सूदची भेटही घेतली.

अमरजीतने सोनू सूदसोबतचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तसेच, सोनू सूदचे आभारही मानले आहे.

अमरजीतला मुंबईला येण्यासाठी सोनू सूदनेच मदत केली. विशेष म्हणजे मुंबईत त्याने सोनू सूदसमोर गाणंही गायलं. तो आला, त्याने गायलं आणि सोनू सूदचं मनही जिंकलं.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे अमरजीतला अच्छे दिन आले. सोनू सूदने अमरजीतला आता फतेह चित्रपटात गाण्याची संधी दिलीय. त्यामुळे, निश्चित त्याच्या करिअरला पहिला ब्रेक मिळाला अन् त्याचं नशिबच पालटलं