Photos: अनन्या पांडेची आई अन् धाकट्या बहिणीला पाहिलंत का, सौंदर्यात अभिनेत्रीलाही देतात मात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:53 PM2024-01-11T15:53:16+5:302024-01-11T16:00:07+5:30

आई नाही तर बहिणच वाटतात भावना पांडे

बॉलिवूडची बबली गर्ल अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या चर्चेत आहे. अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्याने तिच्या सौंदर्यामुळे सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. सध्या अनन्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक दोन्ही आयुष्यामुळे लाईमलाईटमध्ये आहे.

'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अनन्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लहानपणापासूनच अनन्याने हिरोईन होण्याचंच स्वप्न पाहिलं. करण जोहरच्या सिनेमातून एन्ट्री घेतल्यानंतर अनन्या प्रसिद्धीझोतात आली.

सुरुवातीला तिला फारसं यश मिळालं नाही. अनन्याने कार्तिक आर्यनसोबत 'पती पत्नी और वो' सिनेमात काम केलं. हा सिनेमाही फारसा चालला नाही. नंतर तिने 'गहराईया','ड्रीम गर्ल 2','लायगर' हे चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये तिने दीपिका पदुकोण ते विजय देवरकोंडा अशा मेगा कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. मात्र या सगळ्यात अनन्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वळू शकलं नाही.

नुकताच अनन्याचा 'खो गए हम कहा' सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. सोशल मीडियाचं वास्तव दाखवणाऱ्या या सिनेमात तिने केलेल्या अभिनयाचं सध्या प्रचंड कौतुक होत आहे. पहिल्यांदाच अनन्याला अभिनयासाठी वाहवा मिळाली आहे. या सिनेमात तिने सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

प्रोफेशनल आयुष्यात कौतुक होत असतानाच अनन्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. ती सध्या हँडसम कपूर अभिनेता आदित्य रॉय कपूरला (Aditya Roy Kapoor) डेट करत आहे. दोघंही व्हॅकेशनला गेल्याचे फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तर सिनेमांच्या स्क्रीनिंगला, डिनर डेटलाही ते एकत्र दिसत आहेत.

अनन्या पांडेच्या सौंदर्यावर तर अनेक चाहते फिदा आहेत. अगदी तरुणींनाही अनन्याचे लुक्स आवडतात. मात्र तुम्हाला माहितीये का अनन्याची आई भावना पांडेही (Bhavana Panday) दिसायला अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. भावना पांडे चंकी पांडेची पत्नी आहे. तर त्यांना रायसा (Rysa Panday) ही आणखी एक मुलगीही आहे.

नुकतंच भावना पांडे आपली धाकटी लेक रायसासोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचल्या. यावेळी त्यांच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. भावना पांडे यांनी गोल्डन रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता ज्यामध्ये त्या खूपच स्टायलिश दिसत होत्या.

तर अनन्याची धाकटी बहिण रायसा पांडेनेही इव्हेंटमध्ये लाईमलाईट कॅप्चर केलं. ती ब्लॅक रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये दिसली. तिचा निरागसपणा कोणालाही प्रेमात पाडेल असाच होता. दोघींनीही हातात मिनी पर्स कॅरी केली होती. रायसासोबत भावना पांडे या तिच्या आई नाही तर बहिणीसारख्याच दिसत होत्या.

अनन्याची धाकटी बहिण रायसा फक्त १९ वर्षांची आहे. ती सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. तिला गाण्याचीही आवड आहे.