हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी....! व्हायरल होताहेत चंकी पांडेचे पत्नीसोबतचे हे Unseen फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 16:06 IST2021-01-17T15:53:45+5:302021-01-17T16:06:38+5:30
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याच्या लग्नाचा आज 23 वा वाढदिवस.

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे याच्या लग्नाचा आज 23 वा वाढदिवस.
1998 साली आजच्याच दिवशी म्हणजे 17 जानेवारीला चंकी व भावना यांनी लग्नगाठ बांधली होती.
तूर्तास लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चंकी व भावनाचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत.
यातले काही फोटो भावनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
चंकी पांडेचे खरे नाव सुयश पांडे आहे. गेल्या 3 दशकांपासून तो बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह आहे.
17 जानेवारी 1998 रोजी चंकीने भावनाशी लग्न केले.
या दांम्पत्याला दोन मुली आहेत. मोठी मुलगी अनन्या पांडे हिला तुम्ही जाणताच. लहान मुलगी रिसा पांडे ही सध्या हायस्कूलमध्ये आहे.
भावना पांडे ही कॉच्युम डिझाईनर आहे. तिची स्वत:ची एक ओळख आहे.