Kiccha Sudeep Birthday: : सुदीप नावापुढे ‘किच्चा’ का लावतो? माहितीये का यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 16:27 IST2022-09-02T16:15:09+5:302022-09-02T16:27:45+5:30

Kiccha Sudeep birthday: आज जगभरातील चाहते सुदीपला किच्चा सुदीप याचं नावाने ओळखतात. पण सुदीपचं खरं नाव सुदीप संजीव आहे. मग तो नावापुढे किच्चा का लावतो?

2 सप्टेंबर 1971 रोजी कर्नाटकच्या शिमोगा येथे जन्मलेला किच्चा सुदीप हे आज कन्नड सिनेमाचं मोठं नाव आहे. सुदीपने केवळ कन्नडच नाही तर तामिळ, तेलगू, हिंदी सिनेमातही काम केलं.

आज जगभरातील चाहते सुदीपला किच्चा सुदीप याचं नावाने ओळखतात. पण सुदीपचं खरं नाव सुदीप संजीव आहे. मग तो नावापुढे किच्चा का लावतो?

तर यामागे कारण आहे किच्चाचा ‘हुच्चा’ नावाचा सिनेमा. होय, 2011 साली त्याचा ‘हुच्चा’ नावाचा सिनेमा आला होता. यात त्याने किच्चा नावाचा रोल साकारला होता.

किच्चाची त्याची भूमिका लोकांना इतकी आवडली की, पुढे लोक त्याला याच नावाने ओळखू लागले. तेव्हापासून सुदीपने नावापुढे किच्चा नाव लावणं सुरू केलं. आज जगभरात तेच त्याची ओळख बनलं आहे.

किच्चा सुदीप याचा जन्म कर्नाटकात झाला. त्याच्या वडिलांचं नाव संजीव मंजप्पा आणि आईचं नाव सरोजा आहे. त्याच्या वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय होता. साहजिकच आपल्या पोरानं आपल्या व्यवसायात हातभार लावाला, अशी वडिलांची इच्छा होती. पण किच्चा सुदीपला इंजिनअर व्हायचं होतं.

आपल्या याच इच्छेखातर त्याने बेंगळरू मधील इंडस्ट्रीअर प्रॉडक्शनमध्ये इंजिनीअरिंग केलं. पण इंजिनिअर शिकत असताना किच्चा सुदीपला अभिनेता व्हावं असं वाटू लागलं. मग काय त्याने थेट मुंबई गाठली.

मोठ्या पडद्यावर येण्याआधी त्याने छोट्या पडद्यावर काम केलं. प्रेमदा कादंबरी या मालिकेत तो दिसला. या मालिकेतील त्याच्या कामाचं अपार कौतुक झालं आणि यानंतर मोठ्या पडद्यावर त्याची एन्ट्री झाली

1997 साली थैवा या चित्रपटात तो मुख्य अभिनेता म्हणून झळकला. पण त्याला खरी ओळख दिली ती ईगा अर्थात मक्खी या चित्रपटाने. त्याचा हा चित्रपट तुफान गाजला.

बॉलिवूडमध्येही किच्चाने काम केलं. किच्चा सुदीप आणि सलमान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनी ‘दबंग 3’ सिनेमात एकत्र काम केलं. किच्चा सुदीपनं सलमानच्या या चित्रपटासाठी एकही रुपयाचं मानधन घेतलं नव्हतं.

किच्चा सलमान खानच्या बिग बॉस या कार्यक्रमातही सहभागी झाला होता. किच्चा सुदीप स्वत: ‘कन्नड बिग बॉस’ होस्ट करतो.

किच्चा सुदीपनं अनेक कन्नड सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. हे सिनेमे खूप यशस्वी ठरलेत. त्याचं स्वत:चं ‘किच्चा प्रॉडक्शन’ आहे. त्या बॅनरखाली त्यानं अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.

किच्चा सुदीपच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचं तर त्यानं प्रिया राधाकृष्ण हिच्याशी 2001 मध्ये लग्न केलं. किच्चा आणि प्रिया यांना सान्वी नावाची एक मुलगी आहे. किच्चा सुदीप आणि प्रिया यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला परंतु त्यानंतर ते पुन्हा मतभेद विसरून एकत्र आले.