Kainaat Arora : हॉट पण फ्लॉप... दिव्या भारतीची ही बहिण सध्या कुठे आहे, काय करते...?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 05:58 PM2023-03-30T17:58:35+5:302023-03-30T18:13:39+5:30

Kainaat Arora : ग्रँड मस्ती या सिनेमातून कायनातचा डेब्यू झाला. ग्रँड मस्ती हा सिनेमा तुफान चालला. या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली. पण या सिनेमातील कायनात सध्या कुठे आहे? काय करतेय?

बॉलिवूडमध्ये आल्या आणि २-३ सिनेमांनंतर गायब झाल्यात, अशा अनेक अभिनेत्री आहेत. दिव्या भारतीची चुलत बहिण कायनात अरोरा त्यापैकीच एक.

कायनात दिव्या भारतीसारखी दिसायला सुंदर आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. ग्रँड मस्ती या सिनेमातून तिचा डेब्यू झाला.

ग्रँड मस्ती हा सिनेमा तुफान चालला. या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली. पण या सिनेमातील कायनात सध्या कुठे आहे? काय करतेय?

९० च्या दशकात सुपरहिट अभिनेत्री दिव्या भारतीचे अनेक चाहते होते. पण १९९३ मध्ये दिव्या अचानक या जगाला अलविदा म्हणत निघून गेली. दिव्यानंतर तिची चुलत बहिण कायनात बॉलिवूडमध्ये आली.

खरं तर दिव्याकडूनच कायनातने अभिनेत्री बनण्याची प्रेरणा घेतली होती. पण प्रत्यक्षात बॉलिवूडमध्ये आल्यावर दिव्याची बहिण असल्याचा दबावच तिला जास्त जाणवला.

मी दिव्या भारतीची बहिण नसते तर खूप बरं झालं असतं. कदाचित मी आणखी यशस्वी ठरू शकले असते, असं कायनात एका मुलाखतीत म्हणाली होती.

कायनातला २०१३ मध्ये ग्रँड मस्ती सिनेमात पहिला ब्रेक मिळाला. त्याआधी फक्त दोन सिनेमात आयटम सॉन्ग करताना ती दिसली होती.

ग्रँड मस्ती या सिनेमासाठी २०० मुलींमधून तिची निवड झाली होती. विवेक ओबेरॉय तिचा हिरो होता.

ग्रँड मस्तीनंतर कायनातने अनेक सिनेमे केलेत. साऊथच्या काही सिनेमातही ती झळकली. पण तिला मनासारखं यश मिळालं नाही. दिव्या भारतीसारखं स्टारडम तिच्या वाट्याला आलं नाही.

लवकरच कायनात दीपक तिजोरीसोबत टीप्सी या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहिर झालेली नाही.