उफ्फ! ‘गहराइयां’ टीमचं अंडर वॉटर फोटोशूट; पाहा दीपिका, अनन्याचे फोटो पाहून खिळतील नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:46 PM2022-02-18T15:46:04+5:302022-02-18T15:58:18+5:30

Gehraiyaan Stars Underwater Photoshoot : दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा यांचा ‘गहराइयां’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झाला पण चर्चा अजूनही थांबलेली नाही. सध्या ‘गहराइयां’ स्टार्सचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत आहे.

दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे, धैर्य कारवा यांचा ‘गहराइयां’ हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा झाला पण चर्चा अजूनही थांबलेली नाही.

सध्या ‘गहराइयां’ स्टार्सचं अंडरवॉटर फोटोशूट चर्चेत आहे. होय, ‘गहराइयां’च्या स्टारकास्टच्या अंडरवॉटर फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात दीपिकाने ऑरेंज कलरच्या स्वीमसूटमध्ये पोझ दिल्या आहेत. यात दीपिका चांगलीच हॉट दिसतेय.

पाण्यात दीपिकाने दिलेल्या या क्लास फोटोचीही चर्चा आहे. या फोटोत दीपिकाचे बोलके डोळे लक्ष वेधून घेतात.

‘गहराइयां’मध्ये दीपिकासोबत बोल्ड सीन्स देणारा सिद्धांत चतुर्वेदी यानेही अंडरवॉटर मस्त पोझ दिल्या आहेत.

सिद्धांत चतुर्वेदीच्या कलरफुल शर्टमधील या फोटोवर तरूणींच्या उड्या पडत आहेत.

अनन्या पांडे व्हाईट स्वीम वेअरमध्ये दिसतेय. जलपरी असं लिहित तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरही स्वत:चा फोटो शेअर केला आहे.

अनन्याने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.

अनन्याने या चित्रपटात दीपिकाच्या चुलत बहिणीची भूमिका साकारली आहे. नात्यांची गुंतागुंत या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

अभिनेता धैर्य कारवा हाही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्याने दीपिकाच्या पार्टनरची भूमिका साकारली आहे.

धैर्यनेही अंडरवॉटर फोटोशूट करत चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. धैर्य कारवा कॉजेलात शिकत असतानाच मॉडेलिंगमध्ये आला आणि नंतर बॉलिवूडमध्ये त्याची एन्ट्री झाली. रणवीर सिंगच्या अलीकडे रिलीज झालेल्या 83 या सिनेमातही तो दिसला होता. त्याने यात रवी शास्त्री यांची व्यक्तिरेखा साकारली होती.