गळ्यात फुलांचा हार, कपाळी टिळा; लग्नाच्या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाचा मंदिरातील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:56 AM2024-01-25T09:56:33+5:302024-01-25T10:00:28+5:30

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता तमन्नाने कुटुंबासह कामाख्या मंदिराला भेट दिली आहे.

तमन्ना भाटियाने कामाख्या मंदिराला भेट दिली आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

यावेळी तमन्नाने दर्शनासाठी पिवळा सूट परिधान केला होता. तिने लाल ओढणीसोबत तिचा लूक पूर्ण केला.

यावेळी तिच्यासोबत त्याच्या कुटुंबातील काही लोकही दिसले. अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबत भरपूर पोज दिल्या.

अभिनेत्रीने कामाख्या देवीसमोर प्रार्थना केली आणि मंदिरात दिवे लावले. यानंतर तमन्नाने गळ्यात फुलांचा हार आणि कपाळावर टिळक लावल्याचे दिसत आहे.

फोटोंमध्ये तमन्ना कामाख्या देवीच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. तिच्‍या फोटोंना चाहत्‍यांची पसंती मिळत आहे.

अभिनेत्रीने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती शाल घालून मोकळ्या आकाशाखाली पोज देताना दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तमन्ना भाटिया 'वेदा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहमही दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.