फॅशननिस्टा सोनम कपूरचा बॉसी लूक, Photos सोशल मीडियावर व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:25 IST2025-01-10T17:12:44+5:302025-01-10T17:25:44+5:30

बॉलिवूडची फॅशननिस्टा अभिनेत्री सोनम कपूर ओळखली जाते. सोनमच्या प्रत्येक नव्या लूकसाठी चाहते आतुर असतात.

फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.

सोनम कपूरने आता विविध लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि बॉसी दिसत आहे.

या फोटोमध्ये सोनमने क्लासी हॅट परिधान केलेली दिसतेय. केस मोकळे आणि न्यूड मेकअप तिने केला आहे.

या लूकमध्ये सोनम अगदी सुंदर दिसतेय. हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्मोकी आय मेकअप केला आहे. तर गोल्डन कानातले परिधान केले आहेत.

तिचा हसरा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

सोनमने वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो क्लिक केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोनम खूपच स्टायलिश आहे. ती सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

सोनम कपूर शेवटची 'ब्लाइंड' या सिनेमात दिसली होती. तिने दोन वर्षांपूर्वी वायूला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर तिला पूर्ण लक्ष त्याच्याकडे द्यायचं आहे. म्हणूनच ती आता अभिनयापासून दूर असल्याचं सांगते.