Farhan Akhtar-Shibani Dandekarचा वेडिंग अल्बम, नाव बदलल्यानंतर अभिनेत्रीनं शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:53 PM2022-02-23T12:53:19+5:302022-02-23T13:08:00+5:30

Farhan Akhtar-Shibani Dandekar's wedding : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकले.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकले.

लग्नानंतर शिबानी दांडेकरनेही इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलले आहे.

दरम्यान, अभिनेत्रीने लग्नाचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

शिबानीने जे फोटो शेअर केले आहेत त्यात मिस्टर अँड मिसेज अख्तरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत.

या फोटोमध्ये शिबानी दांडेकर पती फरहान अख्तरच्या मिठीत हरवलेली दिसत आहे.

दोघंही एकमेकांसोबत किती आनंदी आहेत, हे दृश्य बघायला मिळतं.

लग्नादरम्यान फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी एकमेकांसोबत रोमँटिक डान्सही केला.

शिबानी दांडेकरचा लग्नातील लूक सध्या चर्चेत आला आहे.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे लग्न खूप चर्चेत आले कारण त्यांनी निकाहदेखील केला नाही आणि सात फेरेदेखील घेतले नाहीत.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा १९ फेब्रुवारीला खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर विवाह झाला.

लग्नानंतर या जोडप्याने आपल्या मित्रांसाठी पार्टीही ठेवली होती.

जेव्हापासून शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर एकमेकांना डेट करू लागले. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरच्या लग्नाच्या वेडिंग अल्बमला खूप पसंती मिळते आहे.