मेहंदी की रात...!! फरहान अख्तर -शिबानी दांडेकरच्या मेहंदी सेरेमनीचे Candid Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 02:54 PM2022-02-24T14:54:48+5:302022-02-24T15:12:53+5:30

Farhan Akhtar Shibani Dandekar Mehandi Ceremony Photos : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर नुकतेच विवाह बंधनात अडकले. या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता शिबानीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर नुकतेच विवाह बंधनात अडकले. खंडाळा येथील फार्महाऊसवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनीही लग्न उरकलं.

या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता शिबानीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

मेहंदी सेरेमनीत शिबानी धम्माल मस्ती करताना दिसतेय. फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.

मेहंदी सेरेमनीत शिबानीने प्रिंटेड को ऑर्ड सेट घातला होता. यात ती प्रचंड सुंदर दिसत होती.

मेहंदी सेरेमनीत शिबानीने धम्माल डान्सही केला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी फरहानच्या हातावरही शिबानीच्या नावाची मेहंदी सजली. खुद्द शिबानीने त्याच्या हातावर मेहंदी काढली.

शिबानीने हातभर मेहंदी न काढता केवळ फरहानचं नाव आपल्या हातावर लिहिलं. पण हा क्षण तिने मनापासून जगला.

शिबानीच्या मेहंदी सेरेमनीत तिची बेस्ट फ्रेन्ड रिया चक्रवर्तीही दिसली. दोघीही मज्जा करताना दिसल्या.

मेहंदी सेरेमनीत फरहान व शिबानी एकमेकांच्या मिठीत विसावलेले दिसले. या कपलने लग्नातला प्रत्येक क्षण एन्जॉय केला.

शिबानी आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांना लग्नाचा निर्णय घेतला आणि अखेर 19 फेब्रुवारी रोजी दोघं विवाह बंधनात अडकले.

विशेष म्हणजे दोघांनी हिंदु किंवा मुस्लीम पद्धतीनं विवाह न करता लग्नाची वचनं घेत आणि रिंग सेरेमनी करत ते विवाहबद्ध झाले.

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांची लव्ह स्टोरी एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान सुरू झाली होती.

2015 मध्ये ‘आय कॅन डू दॅट’ नावाच्या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर त्यांची भेट झाली होती. त्यावेळी फरहान अख्तर विवाहित होता आणि तो शोचा होस्ट होता.

शिबानी या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये मैत्री वाढली होती. हळूहळू ते दोघं एकमेकांच्या जवळ येत गेले.

2018 पासून फरहान अख्तर आणि शिबानी यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर ते विवाह झालेत.

फरहान अख्तर आणि त्याची पहिली पत्नी अधुना भवानी यांचा 16 वर्षाच्या वैवाहिक संसारानंतर 2017 मध्ये घटस्फोट झाला होता.

शिबानी दांडेकर मॉडेल, अभिनेत्री आहे. पुण्यातील एका मराठी कुटुंबामध्ये शिबानीचा जन्म झाला आहे. तिला अनुषा आणि अपेक्षा नावाच्या दोन बहिणी आहेत.

शिबानीची बहीण अनुषा हीदेखील सिनेइंड्स्ट्रीशी संलग्न आहे. शिबानीनं भारताबरोबरच अमेरिकेमध्येही काही शो केले आहेत. अमेरिकेच्या नमस्ते इंडिया, एशियन व्हरायटी शो आणि व्ही देसी सारख्या शोमध्ये ती सहभागी झाली होती.