शॅम्पेन, बोटिंग आणि बरंच काही! प्रसिद्ध गायिकेचा साखरपुडा, बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज करताच झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 15:49 IST2025-05-02T14:42:04+5:302025-05-02T15:49:36+5:30
मनोरंजन सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिकेने अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केलाय. गायिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

प्रसिद्ध गायिका प्रकृती कक्करने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
बॉयफ्रेंडने खास अंदाजात प्रपोज केल्याने प्रकृती भावुक झालेली दिसली. या दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत.
१ मे २०२५ रोजी प्रकृतीने तिचा बॉयफ्रेंड विनय आनंदसोबत साखरपुडा केला आहे. प्रकृतीच्या बॉयफ्रेंडने तिला ड्रीमी अंदाजात प्रपोज केलं.
शँपेन उडवत प्रकृती आणि तिचा बॉयफ्रेंड विनयने जल्लोष साजरा केला. विनय आनंद हे व्यवसायाने उद्योजक असून Aer Media आणि Unbox Social चे सह-संस्थापक आहेत
प्रकृती आणि विनयचे जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रकृती कक्कर ही एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने "भीग लूं", "कतरा कतरा", "माफियां", "हम तुम" यांसारख्या हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे
प्रकृती आणि विनयने अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही. दोघांच्या खास जोडीची आणि रोमँटिक फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे.