"उठा ले रे बाबा, उठाले...", परेश रावल यांचे हे संवाद गाजले, वाचताच चेहऱ्यावर येईल हसू
By देवेंद्र जाधव | Updated: May 30, 2025 13:39 IST2025-05-30T13:04:17+5:302025-05-30T13:39:04+5:30
परेश रावल यांचे अनेक संवाद आठवले तरी चेहऱ्यावर हास्य उमटतं. परेश रावल यांचे सिनेमातील गाजलेले संवाद कोणते? जाणून घ्या (paresh rawal)

परेश रावल हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते. सध्या 'हेरा फेरी ३' सोडल्यामुळे परेश रावल चांगलेच चर्चेत आहेत. परेश रावल यांनी अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांचे संवादही चांगलेच गाजले. एक नजर परेश रावल यांच्या अशाच गाजलेल्या संवादांवर...
२००० साली आलेल्या 'हेरा फेरी' सिनेमातील प्रत्येक संवाद चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत. " उठा ले रे बाबा, उठाले... मैरे को नही इन दोनो को उठाले", "ये बाबूराव का स्टाईल है" हे सिनेमातील अनेक संवाद ऐकले की आजही खळखळून हसायला येतं
"तुम्हारे जैसे लोग पहले सपने दिखाते है फिर कहते है ऐसा हो ही नही सकता", हा नायक सिनेमातील परेश रावल यांचा गंभीर संवाद सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवणारा आहे. याच सिनेमातील "ये धोती खोल रहा है", "फस गया सीएम" हे विनोदी संवादही चांगलेच गाजले
"आप लोगो को उपरवालेने भेजा तो भेजा... लेकिन भेजे में भेजा ही नही भेजा", हा परेश रावल यांचा 'रेडी' सिनेमातील डायलॉग चांगलाच गाजला. या सिनेमात परेश रावल आणि सलमान खानच्या जोडीने प्रेक्षकांना हसवलं
परेश रावल यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'अंदाज अपना अपना'. या सिनेमातील "मैं तेजा हू, मार्क इधर है" हा संवाद असो किंवा "ब्रेड का बादशाह और ऑम्लेट का राजा बजाज, हमारा बजाज" हे संवाद चांगलेच गाजले
"एक बार मेरा दिमाग अगर गरम हो गया ना, तो थंडा भी फटाफट हो जाता है", हा परेश रावल यांचा 'आवारा पागल दिवाना'मधील संवाद त्यांच्या निरागस अभिनयाने चांगलाच चर्चेत राहिला.
हंगामा सिनेमातील "कव्वा कितना भी वॉशिंग मशीन में नहाले.. बगुला नही बनता", "हे भगवान, ये पत्नी है की पनवती" हे डायलॉग आजही आठवले की चेहऱ्यावर हसू येतं. या सिनेमात परेश रावल यांनी साकारलेली तिवारीशेठची भूमिका चांगलीच गाजली